Vicky kaushal tauba tauba song Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातलं ‘तौबा तौबा’ गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. याच ‘तौबा तौबा’ गाण्यावर आता एका आजी आणि नातीनं जबरदस्त असा डान्स केला आहे.

आजी आणि नातीचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स

Mumbai local video of some girls dancing on a marathi song Khandalyachya Ghatat Gadi Chale Zokaat in mumbais local train is going viral
मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे
Loksatta samorchya bakavarun Securities and Exchange Board of India Business Investors
समोरच्या बाकावरून: गोष्टी दिसतात, तशा नसतात!
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…
Two lions trying to attack a dog running with the speed
थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

या व्हिडीओमध्ये आजी आणि नात मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.. हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघितल्यानंतर खऱ्या टॅलेंटला संधीची वाट पाहावी लागत नाही हे सिद्ध होतंय.

एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशा आजीच्या स्टेप

व्हायरल व्हिडिओत आजी आपल्या नातीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. विकी कौशलच्या तौबा-तौबा गाण्याच्या स्टेप्स या खूप अवघड आहेत. तरीही या आजी- नातीच्या जोडीने अगदी सहजपणे या स्टेप्स केल्या आहेत. एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशा स्टेप ही आजी करत आहेत. त्यामुळे या आजीच्या डान्सने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हद्दच झाली! उबेर ड्रायव्हर काळा आहे म्हणत महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

विकी कौशलच्या या फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्याशिवाय तब्बल ३५,८६५ लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने म्हंटलं आहे की, “आजी आणि नातीचं नातं हे खरचं जगावेगळं असतं” तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, “एक नंबर जोडी.”