scorecardresearch

Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…

Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ अवघ्या काहीच सेकंदातच नेटकऱ्यांचा थरकाप उडवत आहे. या घटनेचा तपास सध्या चेतनगंज, पोलिसांकडून केला जात आहे.

Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…
Video: लग्नाच्या वरातीत नाचताना 'तो' खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात… (फोटो: ट्विटर)

Viral Video Today: विज्ञानाची किमया म्हणजे जन्माची चाहूल ९ महिन्यांआधी येते पण मृत्यू कधी येईल याचा अंदाज कोणालाच लावणे शक्य होत नाही. काहींच्या बाबत अगदी वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळूनही मृत्यूचा दूरदूरपर्यंत संबंध येत नाही तर काहींना अगदी पापणी लवण्याच्या आधीच जीव गमवावा लागतो. मागील काही काळात हसताना- खेळताना काहींनी जीव गमावल्याचे अनेक धक्कादायक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. वाराणसी येथील पिपलानी कटरा या परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे समजत आहे. भाच्याच्या लग्नात नाचताना काही सेकंदातच या हसऱ्या व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ अवघ्या काहीच सेकंदातच नेटकऱ्यांचा थरकाप उडवत आहे. प्राप्त माहितीनुसार, मनोज विश्वकर्मा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ४० वर्षीय विश्वाकर्मा हे आपल्या कुटुंबियांसह भाच्याच्या लग्नात नाचताना अचानक जमिनीवर कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे. विश्वकर्मा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज आहे. या घटनेचा तपास सध्या चेतनगंज, वाराणसी पोलिसांकडून केला जात आहे.

Video: पाच सेकंदात मृत्यूचा विळखा..

दरम्यान, मागील काही काळात असे अनपेक्षित मृत्यूचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नवरात्रीच्या दरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीला दांडिया खेळताना हृदयविकाराचा झटका आला होता तर राजस्थानमध्ये मेव्हणीच्या लग्नात नाचताना, दसऱ्याच्या वेळी हनुमान बनलेल्या एका कलाकाराला हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमवावे लागले होते.

दांडिया खेळताना ओढवला मृत्यू

हे ही वाचा<< Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स

एवढंच नव्हे तर काही सेलिब्रिटींचे २०२२ या वर्षात जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याने निधन झाले होते. यासगळ्यावरून हृदयाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. वयाच्या सर्व टप्प्यांवर वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे, हृदयाला घातक ठरणाऱ्या वस्तू, पदार्थ व तणावापासून दूर राहणे हे एका सुदृढ आयुष्याची सुरुवात ठरू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:14 IST

संबंधित बातम्या