scorecardresearch

Video: अमृता फडणवीस यांनी डान्स करून नेटकऱ्यांना दिलं खुलं चॅलेंज, ‘या’ कमेंट्स एकदा वाचाच

Amruta Fadnavis Dance Challenge: अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या चॅलेंजवर पहिल्यांदाच कमेंट बॉक्समध्ये वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे.

Video: अमृता फडणवीस यांनी डान्स करून नेटकऱ्यांना दिलं खुलं चॅलेंज, ‘या’ कमेंट्स एकदा वाचाच
अमृता फडणवीसांचं नेटकऱ्यांना खुलं चॅलेंज (फोटो: ट्विटर)

Amruta Fadnavis Dance Challenge: अमृता फडणवीस या आपल्या बोल्ड व बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांची गाण्याची आवड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. अलीकडेच त्यांनी टी सीरिजसह यूट्यूबच्या माध्यमातून आपले नवे गाणे प्रदर्शित केले आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांना चर्चेला विषय मिळाला. अमृता फडणवीसांच्या गाण्याला आतापर्यंत लाखोंनी व्ह्यूज मिळाले आहेत. हे येत्या काळातील सगळ्या पार्ट्यांमध्ये वाजणारे बॅचलोरेट अँथम असेल असे स्वतः अमृता यांनी सांगितले होते.

आता या गाण्याच्या प्रमोशनसाठीही अमृता फडणवीसांनी अगदी हटके स्टाईल निवडली आहे. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर #MoodBanaleya हॅशटॅगसह डान्स चॅलेंज सुरू केले आहे. स्वतःच्या गाण्यावर अगदी उत्साहात नाचताना अमृता यांनी व्हिडीओ शेअर केलाच पण लोकांनाही या चॅलेंजचा भाग होण्यासाठी आवाहन केले आहे. तुम्हीही तुमच्या भन्नाट स्टेप्स शेअर करा असे म्हणत अमृता फडणवीसांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्य म्हणजे कधी नव्हे ते लोकांनीही या गाण्यावर अगदी पॉझिटिव्ह व कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स

दरम्यान, या पोस्टला ५ लाखाहुन अधिक व्ह्यूज व कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे व्हिडीओ शेअर केले आहेत तर अमृता फडणवीसांच्या डान्सचेही सर्वांनी तोंड भरून कौतुक केले आहे.

आणखी वाचा – “काही गाणी ऐकण्यासारखी नसली तरी…” अमृता फडणवीसांनी ट्रोलिंगवर मांडलं स्पष्ट मत

नेटकऱ्यांनी केलं अमृता फडणवीसांचे कौतुक

आणखी वाचा – ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…

मूड बनलेया हे गाणे ६ जानेवारी २०२३ ला यूट्यूबवर रिलीज झाले. गाण्याला आतापर्यंत 23 मिलियनहुन जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचे संगीत मीत ब्रदर्सने दिले होते आणि गीत कुमार यांनी लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या