Man Carries Bike on Bike Viral Video: भारतीयांचे जुगाड हे जगात भारी असतात असे म्हणतात, अर्थात यात काहीच अतिशयोक्ती नाही. आपल्याकडची हुशार मंडळी आपलं भन्नाट टॅलेंट वापरून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधतात. काहीवेळा तर यांची उत्तरे पाहून भलेभले इंजिनिअरही फेल होऊ शकतात. असाच एक जुगाडू व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क बाईक वर बँक ठेवून घेऊन जात असल्याचे दिसतेय. आता नेमकी अशी काय वेळ आली होती आणि हा जुगाड त्याने केला कसा हे ही पाहूया…
तुम्ही आजपर्यंत वेगवेगळे सामान वाहून नेणारी वाहने पाहिली असतील. अनेकदा वेळ वाचवण्यासाठी वाहनचालक मंडळी प्रमाणापेक्षा अधिक सामान भरून नेतात.अलीकडेच एका उसाने ओव्हरलोड ट्रॅक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण यावेळेस चक्क दोन व्यक्तींनी बाईकवरून बाईकच घेऊन जाण्याचा भलताच पराक्रम केला आहे. तुम्ही बघू शकता की, एक माणूस गाडी चालवत आहे आणि त्याच्यामागे बसलेल्या माणसाने एक बाईक हातात धरली आहे. मंडळी खेळण्यातली नाही चक्क खरी खुरी बाईक घेऊन हा माणूस जात आहे.
सिराज नूरानी या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर करत असा दावा केला आहे की, सदर व्हिडीओ औरंगाबादमधील वैजापूर येथील आहे. एका व्यक्तीने त्याच्या बाईकचे कर्जाचे हप्ते चुकवल्यानंतर फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांनी त्याची दुचाकी जप्त केली, ती सुरू करता आली नाही म्हणून त्यांनी चक्क दुसऱ्या बाईकवरून ती उचलून नेली.
Video: चक्क बाईक वरून बाईक उचलून नेली
हे ही वाचा<< पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? तरुणाचा जुगाडू Video पाहून म्हणाल, “भाई पैसे वाचले”
दरम्यान हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांची व ज्याची बाईक उचलून नेली अशा दोघांचीही दया येत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा