Vat Purnima Viral Video: काल, ३ जूनला राज्यभरात वटपौर्णिमेचा सण धामधुमीत साजरा झाला. पण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात या सणाच्या उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना घडली आहे. मंदिरात असलेल्या वडाच्या झाडाला अचानक आग लागल्याने महिलांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्य म्हणजे याही स्थितीत काही महिलांनी पूजा थांबवलेली दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरच्या मंदिरात अंबाबाईच्या मुख्य मंदिरासह अनेक छोटी मोठी मंदिर आहेत. तसेच वडाचे झाड देखील आहे. वटपौर्णिमेनिमित्त अंबाबाई मंदिर परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली होती. यावेळी पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला. महिला या झाडाखाली मोठ्या प्रमाणात कापूर आणि उदबत्ती लावून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत होत्या. याचवेळी बांधलेल्या दोऱ्याला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे भडका उडाला.

Video: वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाने घेतला पेट

हे ही वाचा<< अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा? दिल्लीचे मुख्यमंत्री पदच नव्हे तर देशही सोडणार? नेमकं प्रकरण जाणून घ्या

दरम्यान, मंदिरातील अग्निरोधक मशीनच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांना आग विझवताना अडथळा आला होता. १५ ते २० मिनिटानंतर आग विझवण्यात मंदिर प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की झाडाचा काही भाग पूर्णपणे जाळून खाक झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video banyan tree catches fire during vat purnima puja in kolhapur over excited women still made mistakes trending online svs
First published on: 04-06-2023 at 10:48 IST