scorecardresearch

काजल बघतेस ना.. प्रेमवेड्याने कपाळावर काढला ‘ती’ चा टॅटू? Video मध्ये दुसऱ्याच क्षणी जे झालं..

व्हिडीओच्या सुरुवातीलाच आपण पाहू शकता की त्याने चक्क आपल्या कपाळावर तिच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे, पण मग जे होतं..

Video Boyfriend Tattoo Girls Name On Forehead People Call Him Stupid Do Not Miss Shocking End Viral clip Trending Valentine
काजल बघतेस ना.. प्रेमवेड्याने कपाळावर काढला 'ती' चा टॅटू? Video मध्ये दुसऱ्याच क्षणी जे झालं.. (फोटो: इंस्टाग्राम)

Valentine Viral Video: व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असताना प्रेमवीर आपल्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करत आहेत. दरदिवशी त्यांचे हे प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर येत आहे पण प्रेमात या पठ्ठ्याने अगदी सीमाच पार केली आहे. पूर्वीपासून आपल्याकडे प्रियकर प्रेयसी एकमेकांचे नाव गोंदवून घेतात. हातावर, मानेवर, हृदयाजवळ म्हणून छातीवर नाव गोंदवल्याचे प्रकार आपणही ऐकून- बघून असाल. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील तरुण आपल्या प्रेयसीच्या प्रेमात पुरता वेडा झालाय. व्हिडीओच्या सुरुवातीलाच आपण पाहू शकता की त्याने चक्क आपल्या कपाळावर तिच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर थक्क झाल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. या तरुणाला काहींनी निब्बा म्हंटल आहे. पण बहुतेक या मंडळींनी हा व्हिडीओ पूर्ण पाहिलेला नसावा कारण टॅटू काढून झाल्यावर पुढच्याच सेकंदाला जे घडतं ते बघून तुम्हीही हुश्श म्हणाल.

काजल याला हो म्हणेल का?

हे ही वाचा<< जेव्हा ChatGPT तारक मेहता मालिकेचा एपिसोड लिहितं.. जेठालाल- बबिताची ‘ही’ भन्नाट स्टोरी होतेय व्हायरल

जसं की तुम्हीही पाहिलं असेल की हा पूर्ण व्हिडीओ एक प्रॅन्क होता. पण खरोखरच आपल्या प्रेमात मर्यादा विसरलेली लोकंही सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अलीकडेच अजमेर मधून अशाच एक प्रेमवेड्या कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवून हा पठ्ठ्या भररस्त्यात रोमँटिक झालेला दिसून आला होता. प्रत्येकाच्या प्रेमाची व्याख्या व व्यक्त करण्याची पद्धत तर आपण बदलू शकत नाही पण निदान असे जीवघेणे खेळ थांबवण्याचा सल्ला मात्र नक्की देऊ शकतो.

तुम्ही या व्हॅलेंटाईनला तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी काय करणार आहात हे कमेंट करून नक्की कळवा!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 14:53 IST