हिमाचल प्रदेशात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांतील वरच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे मनालीमध्ये बियास नदीने आपला मार्ग बदलला आहे. भूस्खलनामुळे चंदीगड मनाली महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हिमाचलमध्ये तीन ठिकाणी ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. शिमल्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी शिमला जिल्ह्यातील रामपूर विभागातील झाकरी भागातील समेज खड्यात हायड्रो प्रोजेक्टजवळ मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे गोंधळ उडाला आणि २२ जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, मंडी जिल्ह्यातील चोहर खोऱ्यातील तिक्कन थलटू कोडमध्ये, अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आणि लोकांनी जीव वाचावण्यासाठी जंगलाकडे धाव घेतली आहे. रामपूर, शिमला येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी मंडीचे जिल्हा दंडाधिकारी अपूर्व देवगण हेही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्तेही ठप्प झाले आहेत. रामपूर, शिमला येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. समेळ खड्ड्यामध्ये काल रात्री आलेल्या पुराने आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले. गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त अनुपम कश्यप आणि पोलिस अधीक्षक संजीव गांधी हेही रवाना झाले आहेत. एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. हेही वाचा - Wayanad landslides: भूस्खलनाच्या सहा महिन्यांपूर्वी किती सुंदर दिसत होते वायनाड, मुंडक्काईचे निसर्ग दर्शविणारा Video Viral उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून ५० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. एसडीएम रामपूर निशांत तोमर घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता बंद असल्याने त्यांना उपकरणे घेऊन दोन किलोमीटर पायी जावे लागले. हेही वाचा - “एवढी घाई कशाला!”, लोक बघत राहिले अन् डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेले आजोबा , Video Viral बचावकार्य सुरु अनुपम कश्यप यांनी सांगितले की, तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आयटीबीपी आणि विशेष होमगार्डच्या तुकडीचाही बचाव पथकात समावेश करण्यात आला आहे. बचाव कार्यात रुग्णवाहिकेसह सर्व मूलभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये पोलिस, होमगार्ड, अग्निशमन दल, सुन्नी धरण व्यवस्थापन आदी विभागांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीखंड टेकड्यांवर ढगफुटीमुळे आलेला पूर, कुल्लू जिल्ह्यातही नुकसान झाले. हेही वाचा - रील शुट करण्यासाठी खडकावर चढला अन् पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला तरुण, काळजात धडकी भरवणारा Video Viral कुल्लूमध्ये अनेक घरे वाहून गेली कुल्लू जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मलाणा येथील वीज प्रकल्प १ चे धरण फुटले. धरण फुटल्याने रस्ते, पूल आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले. पार्वती नदीला मोठा पूर आल्याने भुंतरच्या आसपासच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. कुल्लू जिल्ह्यातील बागीपुलमध्ये पुरामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. अनेक घरे वाहून गेली आहेत. कुल्लूमध्ये शाळेची इमारत आणि दवाखानाही पुरात वाहून गेला शिमलाच्या रामपूर भागात ज्या भागात पुरामुळे विध्वंस झाला तो कुल्लू जिल्ह्याला लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरात ढगफुटीमुळे कुरपण, समेळ आणि गणवी खड्डमध्ये भीषण पूर आल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे चित्र आहे. सुमारे दोन डझन घरे आणि अनेक वाहने वाहून गेल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत आणि दवाखानाही पुरात वाहून गेला आहे. शिमला जिल्ह्यातील गझनवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्येही वाहत्या नाल्याने कहर केला आणि श्रीखंडच्या टेकड्यांवरील नैन सरोवराभोवती ढगफुटी झाल्यामुळे तीन खडो म्हणजेच लहान नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला ज्याने खाली जाऊ एक पुराचे स्वरूप घेतले. मलाणा प्रकल्प धरण २ चेही पुरामुळे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात झालेल्या भूस्खलनामुळे ११४ घरांचे नुकसान राज्यात पावसाळ्यात पाऊस आणि भूस्खलनामुळे ११४ घरांचे नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिली आहे. यातील १९ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ९५ घरांचे अंशत: नुकसान झाले. याशिवाय पाच दुकाने आणि ८७ गोठ्याचीही पडझड झाली. राज्यात पावसाळ्यात ४३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे १८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रस्ते अपघातात ६६ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर उंचीवरून घसरून, बुडून, प्रवाही प्रवाह, विजेचा धक्का आणि सर्पदंश यामुळे ६५ मृत्यू झाले आहेत. राज्यात ३८ टक्के कमी पाऊस २७ जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून राज्यात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. लाहौल-स्पीतीमध्ये सामान्यपेक्षा ७९ टक्के कमी, किन्नौरमध्ये ४९ टक्के, उनामध्ये ४७ टक्के, चंबामध्ये ४५ टक्के, हमीरपूरमध्ये ४१1 टक्के, सिरमौरमध्ये ४४ टक्के, सोलनमध्ये ४३ टक्के, बिलासपूर आणि कुल्लूमध्ये ३१टक्के, १५ टक्के कांगडा मंडीमध्ये १७ टक्के कमी तर शिमल्यात१४ टक्के कमी पाऊस झाला आहे. हेही वाचा - “हे लोक सुधारणार नाही”, समुद्राची लाट जोरात आली अन् क्षणात वाहून गेले किनाऱ्यावरील लोक, थरारक Video Viral ५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.