दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण फटाके फोडण्यासाठी अतिशय उत्साही असतो. आपल्या प्रियजनांसोबत हा सण साजरा करता यावा यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. आपण आपल्या नातेवाईकांपासून लांब राहतो, त्यामुळेच त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी आपल्याला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आजकाल अनेक लोक मेट्रोचा मोठ्याप्रमाणावर वापर करतात. हीच गोष्ट लक्षात ठेवून दिल्ली मेट्रोने प्रवाशांना फटाक्यांसंबंधी एक महत्त्वाची सूचना अगदी हटके पद्धतीने दिली आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीदरम्यान हजारो प्रवासी दिल्ली मेट्रोचा वापर करतात. हे लक्षात घेऊन दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) या उत्सव काळात सर्वसमावेशक प्रवास योजना तयार केली आहे. यासोबतच दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या बंदीला दिल्ली मेट्रो सहकार्य करत आहे. यादरम्यान, प्रवाशांकडून आलेल्या एका प्रश्नाला दिल्ली मेट्रो प्रशासनाने जबरदस्त उत्तर दिले आहे.

Video: ऑफिसमध्ये बसल्या जागी ओढावला मृत्यू, असं नेमकं काय झालं स्वतः पाहा

मीम्सच्या जगात आपला ठसा उमटवत, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिवाळीपूर्वी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्रवाशांनी केलेला प्रश्न शेअर केला आहे. यामध्ये प्रवाशांनी दिल्ली मेट्रो प्रशासनाला विचारले, “दिल्ली मेट्रोमध्ये फटाके वाहून नेण्याची परवानगी आहे का?” यावर त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये प्रवाशांच्या प्रश्नावरील उत्तर म्हणून दलेर मेहंदीचे गाणे वाजताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रो प्रशासनाने दिलेल्या या उत्तरात दलेर मेहंदीचे “ना ना ना ना ना रे” हे गाणे वाजताना आपल्याला दिसेल. दिल्ली-एनसीआर भागात प्रवास करण्यासाठी दररोज हजारो प्रवासी दिल्ली मेट्रोचा वापर करतात. डीएमसीआरने दिवाळीसाठी वाहतुकीच्या विशिष्ट वेळाही जाहीर केल्या आहेत.

Viral Video: जिराफच्या पिल्लावर सिंहिणीचा अचानक हल्ला; आईने जीवाची पर्वा न करता केला जबरदस्त पलटवार!

अनेकजण दिवाळीला फटाके फोडतात. मात्र, दिल्लीसह अन्य शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त असल्याने येथे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या दिवाळीत, दिल्ली सरकारने इको फ्रेंडली फटाक्यांसह सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवण, विक्री आणि फोडण्यावर बंदी घातली आहे आणि त्यांचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.