Cat Monkey Viral Video: सर्व प्राण्यांमध्ये मांजरी या थोड्या जास्त मूडी आणि गर्विष्ठ म्हणून ओळखल्या जातात. ज्या प्रेमाने एखादा कुत्रा तुमच्याकडे धावत येईल तेवढ्या सहज मांजरी माया दाखवत नाहीत, निदान सुरुवातीचे काही दिवस तरी! पण एकदा का मांजरीने एखाद्याला लळा लावला की मग तुमच्या जीवाची सगळी काळजी त्यांना असते. अशाच एका मांजरीचा, आईचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. यात मांजरीने आपल्या पोटाशी माकडाचं पिल्लू घेऊन माणसाला लाजवेल अशी आपुलकी दाखवून दिली आहे. या व्हिडिओमधून प्रत्येकालाच काही ना काही शिकण्यासारखे आहे.
ट्विटरवर @Buitengebieden या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये माकड व मांजरीची अनोखी मैत्री पाहायला मिळत आहे. एक मांजर माकडाला आपल्या पोटाशी बांधून रस्ता ओलांडताना दिसत आहे. माकडाची बाळं अशाच प्रकारे आपल्या आईच्या पोटाला लटकून सुरुवातीचे काही दिवस राहतात, या माकडाची आई झालेल्या मांजरीचे प्रेम खरोखरच हेवा माणुसकीचा धडा देणारे आहे.
माकडाची आई बनली एक मांजर
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर तब्बल १२ लाख व्ह्यूज आहेत, अनेकांनी यावर कमेंट करून या राण्यांचंमैत्रीला , प्रेमाला, आपुलिकाला दाद दिली आहे. आपण माणसं भांडत राहू आणि प्राणीच प्रेमाने जग जिंकतील असेही काहींनी म्हंटले आहे.
हे ही वाचा<< किंग कोब्रावर गोळ्या झाडायला गेला अन्…खवळलेल्या सापाने पार रडकुंडीला आणलं; Video पाहून उडेल थरकाप
तर काही युजर्सनी मांजरीच्या चेहऱ्यावर फार काही आनंद दिसत नाही असेही म्हंटले आहे. मांजरीचे अनेक व्हिडीओ दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण नेटकऱ्यांचं मते हा आजचा सोशल मीडियावर पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडीओ आहे. तुम्हालाही असेच वाटते का? कमेंट करून नक्की कळवा.