scorecardresearch

Premium

कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली ‘ही’ कला; मुक्या जीवाचं प्रेम पाहून डोळे भरून येतील

Viral Video Of Cats: हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर ८ लाखाहून अधिक लाईक्स व दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीस नशीबवान म्हटले आहे.

Video Cat Learns Sign Language To Make Deaf Owner Understand her Feelings ,Funny Kitten Goes Viral, Video Will Make You Emotional
कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली 'ही' कला (फोटो: इंस्टाग्राम)

Cat Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काहींसाठी गोंडस कुत्र्या- मांजरांचे व्हिडीओ म्हणजे दिवसभराचा थकवा घालवण्याचा एक सोपा मार्ग ठरतो. काही वेळेस ही व्हिडीओ आपल्याला प्राणी फक्त बोलता येत नाही म्हणून माणसांपेक्षा कमी नाहीत हे अक्षरशः डोळे उघडून पाहायला लावणारे असतात. आज व्हायरल होणारा व्हिडीओ सुद्धा असाच काहीसा आहे. असं म्हणतात की, निसर्गाने प्रत्येकाला एखादी खास गोष्ट दिलेली असते ज्यामुळे आपल्याला आपल्यातील काही कमतरतांची उणीव भरून काढता येऊ शकते. याच नियमाने व्हायरल व्हिडिओमधील मांजरीला भन्नाट बुद्धी व तिच्या कर्णबधिर मालकाला समजूतदारपणाचे वरदान मिळालेलं दिसतंय.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या मांजरीसह एका हॉटेलमध्ये बसलेला दिसतोय. स्क्रीनवर लिहिलेल्या मजकुरानुसार ही व्यक्ती कर्णबधिर आहे. कदाचित ही मांजर अनेक वर्षांपासून या व्यक्तीसह राहत असावी. कारण कितीही ओरडलं तरी आपल्या मालकाला ऐकू येत नाही हे तिला चांगलंच कळलंय. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मांजरीने आपलं म्हणणं समजावून सांगण्यासाठी वेगळाच फंडा वापरला आहे. मांजरीचे हे टॅलेंट बघून सर्वच थक्क झाले आहेत.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

Video: कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली ‘ही’ कला

हे ही वाचा<<वजनावरून महिलेचा भयंकर अपमान; एअरपोर्टचा ‘हा’ Video पाहून लोकं म्हणतात, “एवढी लाज कधीच वाटली नाही”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर ८ लाखाहून अधिक लाईक्स व दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीस नशीबवान म्हटले आहे. “आता मांजरीला पण साइन लँग्वेज येतेय पण मला नाही”, “आमची मांजर तर इशारा नाही थेट हल्लाच करायला तयार असते” अशा वेगवेगळ्या मजेशीर कमेंट सुद्धा या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 08:17 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×