Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून शेअर करतात तर कोणी घरातील गमती जमती व्हिडीओच्या माध्यमातून सांगतात. कुटुंबाशी संबंधित किंवा आई, बाबा, बहीण भाऊ, लहान मुले यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क पुरण पोळी तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
हा व्हायरल व्हिडीओ स्वयंपाकघरातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला गॅसओटा दिसेल. तिथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि चिमुकला पुरण पोळी तयार करताना दिसत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, चिमुकला पोळी लाटतो, त्यात पुरण पोळी भरतो आणि पुन्हा पुरण पोळी लाटतो. त्यानंतर तो तव्यावर भाजतो. हा चिमुकला अप्रतिम अशी पुरण पोळी बनवतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एवढ्या लहान वयात त्याला पुरण पोळी करता येते, हे पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर लिहिलेय, “आई म्हणत होती मुलगी असती तर पुरण पोळी केली असती? पण भाऊ आहे ना?”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
shivnanda.swami.73a या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय करू चपातीच गायब झाली आणखी सापडलीच नाही राव ! म्हणून पुरण पोळी केली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणसाने स्वंयपोषी असल पाहिजे कधी कुठ कशाच काम पडेल ते सांगता येत नाही त्यासाठी परिपूर्ण होण गरजेच आहे !” तर एका युजरने लिहिलेय, “परफेक्ट पुरण पोळी” आणखी एका युजरने लिहिलेय, “पिल्लू खूप हुशार आहे” एक युजर लिहितो, “भारीच” अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.