scorecardresearch

Video: कंडोम कॅफे पाहिलात का? जेवण होताच गिफ्टमध्येही दिला जातो मोफत कंडोम, पाहा झलक

Condom Cafe: व्हायरल इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये ख्रिसमसच्या रंगात रंगलेल्या कंडोम कॅफेची झलक पाहायला मिळते.

Video: कंडोम कॅफे पाहिलात का? जेवण होताच गिफ्टमध्येही दिला जातो मोफत कंडोम, पाहा झलक
Video: कंडोम कॅफे पाहिलात का? जेवण होताच गिफ्टमध्येही दिला जातो मोफत कंडोम (फोटो: इंस्टाग्राम)

Condom Cafe Viral Video: सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देण्यासाठी कंडोमच्या जाहिराती या अगदी प्राईम टाइमला सुद्धा दाखवल्या जातात. यामुळे अनेकदा घरच्यांसमोर खजील व्हायला होतं हे वेगळंच पण हा मुद्दा समोर येणं आणि त्यावर मुक्त चर्चा होणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. याच विचारातून अलीकडे उभारलेले एक कंडोम कॅफे सध्या चांगलंच चर्चेत आहे. व्हायरल इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये ख्रिसमसच्या रंगात रंगलेल्या कंडोम कॅफेची झलक पाहायला मिळते. या ख्रिसमस थीम साठी सुद्धा कंडोम वापरून सजावट करण्यात आली आहे. या कॅफेमध्ये कंडोम थीमची अनेक हस्तनिर्मित उत्पादने सुद्धा विकली जातात.

आहे की नाही बिझनेसची सगळ्यात भन्नाट आयडिया! थायलंडमधील या कॅफेमध्ये अगदी रंगीबेरंगी सजावट पाहायला मिळते. यात अनेक ठिकाणी कंडोम सह अन्य गर्भनिरोधकांच्या उत्पादनाची सुद्धा जाहिरात करण्यात आली आहे. जसे या व्हिडिओतून तुम्ही कॅफेमध्ये प्रवेश घेता तेव्हा बाजूला काही पोस्टर्स व व्हिज्युअल्स पाहायला मिळतात. यात सेक्स, कौटुंबिक नियोजन याविषयांवर जागरूकता निर्माण करणारे मीम्स व विनोदी कोट्स लिहिलेले आहेत.

हेही वाचा – मेरी ख्रिसमसच्या ऐवजी हॅप्पी ख्रिसमस का म्हणत नाहीत? स्वतः राणी एलिझाबेथने सांगितलं होतं ‘हे’ मोठं कारण

सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे या कॅफेमध्ये खाऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला चक्क मोफत कंडोम सुद्धा दिले जात. सोहम सिन्हा याने शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कंडोम कॅफे पाहिलात का?

व्हिडिओच्या कॅप्शननुसार, कंडोम आणि कॅबेज नावाचा अनोखा कंडोम-थीम असलेला कॅफे बँकॉक, थायलंड येथे आहे. इथे थायलंडचे पारंपरिक पदार्थ कोल्ड्रिंक आणि आइस्क्रीम मिळते.हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याला २१ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 11:17 IST

संबंधित बातम्या