Couple Romantic Dance In Rain Video: भारताच्या सर्वच राज्यांमध्ये आता मान्सूनचे आगमन झाले आहे. उन्हाने रखरखलेले रस्ते पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे माणसांच्या वागण्यात आलेला रुक्षपणा पहिल्या मातीच्या सुगंधामुळे निघून गेला आहे. जशी झाडाला नवी पालवी फुटावी तसा आनंद ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. कधी रस्त्यात कुत्र्यांबरोबर नाचून लहान मुलांचा डान्स व्हायरल होतोय तर कधी उंदीरमामा स्वतः पावसात नाचताना दिसत आहेत. अशातच एका जोडप्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एरवी रस्त्यात लोकांचा रोमान्स पहिला की अक्षरशः संस्कार काढणारे लोक सुद्धा या जोडप्याचा गोड क्षण पाहून आपल्याबाबतही असं काही घडावं अशी प्रार्थना करतायत. तर काहींनी मात्र आपल्याबाबत असं का घडू शकत नाही याची धम्माल कारणे दिली आहेत.

तुम्ही बघू शकता, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक जोडपं रस्त्याच्या कडेला बाईक लावून पावसात नाचताना दिसत आहेत. एकमेकांकडे पाहताना, हसत, लाजत, हातात हात घेऊन हळुवार पद्धतीने केलेला डान्स पहिल्यांदाच नेटकऱ्यांना खूप रोमँटिक वाटला आहे. एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटातील सीन वाटावा अशा पद्धतीने ते दोघे कोणत्याही म्युझिकशिवाय आनंद अनुभवतायत. साधारण व्हिडीओचे बॅकग्राऊंड पाहता ही वेळ रात्रीची असावी कारण एकतर अंधार दिसतोय पण रस्त्यात गर्दी सुद्धा तशी फारशी नाहीये. नेमका हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे कळलं नसल्याने नेटकऱ्यांनी आपल्या शहरातील व्यथा सांगायला सुरुवात केली आहे.

Video: जोडप्याचा रोमान्स व्हायरल

ही क्लिप मयूर नावाच्या एका व्यक्तीने X वर पोस्ट केली होती, ज्याने नेटिझन्सना विचारले की असा रोमँटिक डान्स तुमच्या पार्टनरबरोबर यंदाच्या पावसात करण्यापासून तुम्हाला कोण थांबवतंय? यावर नेटकऱ्यांनी भन्नाट मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला की, “आम्ही तर नाचू रे पण आमच्याकडे पार्टनर नाही त्याचं काय”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “इथे रस्त्यात गाड्यांना जागा नाही, नाचायला कुठे जाऊ”. आमच्याकडच्या रस्त्यात भाऊ खूप खड्डे आहेत, नाचताना पडलो म्हणजे..” या कमेंटवर नेटकऱ्यांनी सर्वाधिक सहमती दर्शवली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हे ही वाचा<<आता काय व्हायचं? मंडपात नवऱ्याने नवरीला किस करताच झाला अनर्थ! अर्धे वऱ्हाडी हॉस्पिटलला गेले, अर्धे थेट.. पाहा Video

तुम्हाला हा व्हिडीओ आवडला का? पावसाळ्याविषयी तुमच्या अशा काही आठवणी आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा.