VIDEO: रस्त्यात नाचणं तरुणीला पडलं महागात; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल पण…

ट्रॅफिक सिग्नलवर वाट पाहणारे प्रवासी तिच्याकडे बघून गोंधळलेले व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

viral video of indore women
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Anurag Dwary/Twitter)

ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका व्यस्त चौकात एका महिलेने नाचण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे धावताना चित्रण केले. इन्स्टाग्राम व्हिडीओसाठी केलेला स्टंट आता तिला महागात पडला आहे. पोलिसांनी तिला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावली आहे.श्रेया कालरा असं या महिलेचे नाव आहे असे सांगितले जात आहे. या महिलेने तीन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता आणि काही वेळातच व्हिडीओ व्हायरल झाला. काळ्या पोशाखात सुश्री कालरा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या दिशेने धावताना दिसतात. त्यानंतर त्या तिकडे डान्स करतना दिसतात. ट्रॅफिक सिग्नलवर वाट पाहणारे प्रवासी तिच्याकडे बघून गोंधळलेले व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

कॅप्शनमध्ये केला बदल

हा व्हिडीओ इंदोरच्या रासोमा स्क्वेअर येथे चित्रित करण्यात आला आहे. क्लिपच्या सुरुवातीला, इन्स्टाग्रामरने सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय स्वतःचे चित्रीकरण केले – ज्यामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्यावर टीका केली.या व्हिडीओवर इंस्टाग्रामवर अनेक गंभीर कमेंट्स करण्यात आल्या आहेत. सुश्री कालरा यांनी आता त्यांचे कॅप्शन अपडेट केले आहे. त्यांनी आता फॉलोअर्सला वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “कृपया नियम मोडू नका – लाल चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिग्नलवर थांबावे लागेल. मी नाचत आहे असा त्याचा अर्थ नाही. ” त्यांनी लिहिले, त्यांच्या फॉलोअर्सला मास्क घालण्याचे आवाहनही केले.

सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट कलाकारांना अडचणीत आणण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडेच, मुंबई पोलिसांनी एका मोटारसायकल स्टंटसाठी दोन दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Video dancing on zebra crossing street cost a young woman dearly video goes viral on social media but ttg