scorecardresearch

Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..

Bike Stunt Went Wrong Viral Video: आपल्या प्रेमाच्या नशेत धुंद असणाऱ्या अशाच एका जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्दीच्या रस्त्यात गाडी चालवताना..

Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..
Video: भररस्त्यात बाईकवर 'या' जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा (फोटो: ट्विटर)

Dangerous Bike Stunt Viral Video: असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमात असलेला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. पण एकवेळ तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नसेल तरी इतरांचा जीव महत्त्वाचा आहे हे विसरता कामा नये. आपल्या प्रेमाच्या नशेत धुंद असणाऱ्या अशाच एका जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्दीच्या रस्त्यात गाडी चालवताना सुद्धा जोडपी एकमेकांमधून हवा सुद्धा जाऊ नये इतकी चिकटून बसलेली असतात हे आपणही पाहिलं असेल, पण मागे बसायचं सोडून चक्क गाडीच्या टाकीवर बसून प्रियकराला आपल्या मिठीत घेणारी प्रेमिका पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहाच..

प्राप्त माहितीनुसार व्हायरल होणारा व्हिडीओ हा भिवंडी येथील एका बाइक स्टंटचा आहे. व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करताना पुढे जात आहे. पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, जेव्हा शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकावतो. दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये मुलगा पल्सर बाइक चालवत आहे. झुबेर शब्बीर मोमीन असे त्याचे नाव असल्याचे समजतेय.

जीवावर बेतणारं प्रेम..

हे ही वाचा<< Video: केस हायलाईट करायचा विचार करताय? आधी ‘या’ बाईची काय अवस्था झाली पाहा, डोक्यात जाळ..

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून या जोडप्याचं प्रेम नव्हे तर मूर्खपणाच दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हंटल आहे. आपली चूक असूनही ज्या पद्धतीने या व्हिडिओतील तरुण त्या शूटिंग करणाऱ्या तरुणावर भडकला आहे यावरून तरी त्याला आपलं काही चुकल्याची जाणीव नसावी असं दिसतंय. आपण हा व्हिडीओ पाहून असा पराक्रम करण्याचा विचारही करू नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 14:59 IST

संबंधित बातम्या