Haryana Road Rage Incident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक अपघातांच्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावरही भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. दरम्यान हरयाणातील पंचकुलामध्ये रोडरोमिओंचा एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. कारमधील आरोपीने आधी डॉक्टरला धडक दिली. त्यानंतर त्यांना बोनेटला लटकवून सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरोपीपासून स्वतःला वाचवले आणि गाडीत बसलो. आरोपींनी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली. पीडित डॉक्टरने सांगितले की, आरोपीच्या गोंधळानंतर काही लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर तो कारमधून बाहेर पडला. दरम्यान, आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत गाडीचा वेग वाढवला. मी आरोपीच्या गाडीवर अचानक पडलो, त्यानंतर त्याने मला बोनेटवर ओढले आणि काही अंतरापर्यंत नेले. यादरम्यान आरोपीची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीला धडकली, त्यामुळे डॉक्टर बोनेटवरून खाली पडले आणि आरोपीने तेथून पळ काढला.
आरोपीवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित डॉ. गर्ग यांनी रूग्णालयात पोहोचून उपचार घेतले आणि पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी संबंधित आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपी कार चालकाला अटक करण्यात येईल असं सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: “एक्स्ट्रा लगेज का पैसा लगेगा सहाब” रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी मुंबईकरानं शोधला भन्नाट जुगाड
या घटनेचा सिसीटीव्ही देखील समोर आला असून याद्वारे पोलीस पुढील तपास करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही संतापले असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.