scorecardresearch

Video: टॉमी झाला नवरा, जेली नवरीबाई.. माणसांपेक्षा थाटात लागलं लग्न; वरातीत पाहुण्या कुत्र्यांची भन्नाट पार्टी

Dog Wedding Viral Video: या दोघांच्या लग्नाचा थाटमाट इतका जबरदस्त होता की बड्या बड्या सेलिब्रिटींपासून ते वृत्तसंस्थांनाही याची दखल घ्यावी लागली.

Video: टॉमी झाला नवरा, जेली नवरीबाई.. माणसांपेक्षा थाटात लागलं लग्न; वरातीत पाहुण्या कुत्र्यांची भन्नाट पार्टी
Video: टॉमी झाला नवरा, जेली नवरीबाई..माणसांपेक्षा थाटात लागलं लग्न (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dog Wedding Viral Video: भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. तुम्ही पण आतापर्यंत अनेकांचे लग्नाचे फोटो व्हिडीओ पाहिले असतील. पण आता सोशल मीडियावर एका भलत्याच लग्नाचा बोलबाला आहे. नवरोबाचं नाव आहे टॉमी आणि नवरीचं नाव आहे जेली. या दोघांच्या लग्नाचा थाटमाट इतका जबरदस्त होता की बड्या बड्या सेलिब्रिटींपासून ते वृत्तसंस्थांनाही याची दखल घ्यावी लागली. आता तुम्ही म्हणाल एवढं आहे तरी काय या लग्नात तर मंडळी ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टॉमी हा एक नर (कुत्रा) आहे तर आणि जेली बाई ही एक एक मादी (कुत्री) आहे. तब्बल ४० ते ४५ हजार रुपये खर्च करून या दोघांचे आलिशान लग्नविधी लावून देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये रविवारी टॉमी व जेली यांची रेशीमगाठ जुळवण्यात आली. फक्त लग्नच नव्हे तर वरातीतही मोठा उत्साह दिसून आला. ढोल ताशाच्या गजरात नवरा- नवरीची पद्धतशीर मिरवणूक काढण्यात आली होती. अत्रौली येथील टिकरी रायपूर येथील रहिवासी डॉ. रामप्रकाश सिंह यांचे सात महिन्यांची जेली हे आणि सुखरावली गावचे प्रमुख दिनेश चौधरी यांचा कुत्रा टॉमी यांच्या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत गाजत आहे.

प्राप्त माहितीनुसार टॉमी आणि जेलीचे लग्न मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर लागले होते. लग्नाच्या दिवशी टिकरी रायपूरहून वधूपक्ष सुखरावली गावात पोहोचला. जेलीच्या कुटुंबातून आलेल्या लोकांनी टॉमी म्हणजेच जावईबापुंचे औक्षण करून स्वागत केले. यानंतर वरातीत वर-वधू पक्ष दोघंही चांगलेच थिरकले.

लग्नाची मिरवणूक वधू जेलीच्या घरी पोहोचल्यानंतर मालक आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्या दोघांच्या हस्ते हार घालून लग्नावर शिक्कामोर्तब केला. लग्नाची पार्टी म्हणून वऱ्हाडी, शेजारी- पाजारी फिरणारे मित्र कुत्रे या सगळ्यांना देशी तुपाचे लाडू वाटण्यात आले.

Video: असं लग्न तुम्ही कधीच पाहिलं नसेल

हे ही वाचा<< चित्त्याच्या वेगाने पळत गेला कुत्रा अन् ५० मेंढ्या एकट्याने..१ कोटी लोकांनी पाहिलेला ‘हा’ Video आहे तरी काय?

असं म्हणतात भारतीयांना सेलिब्रेशनची नुसती संधी हवी असते. आणि आता हे लग्न या समजुतीला खरं ठरवतंय असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 11:39 IST

संबंधित बातम्या