scorecardresearch

Video: लाइव्ह मॅच दरम्यान जाणवले भूकंपाचे धक्के, घटना कॅमेऱ्यात कैद

U-19 World Cup: २९ जानेवारीला लाइव्ह मॅच दरम्यान जमिनीवर भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Earthquake during live match
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @PeterDellaPenna / Twitter)

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेली अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा (U-19 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर लीग उपांत्य फेरीसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. आज १ फेब्रुवारीला पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सामना अफगाणिस्तानशी होणार असून दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत अनेक शानदार सामने पाहायला मिळाले. मात्र, अशा काही घटनाही घडल्या, ज्या पाहून चाहते आणि कमेंटेटर्सही आश्चर्यचकित झाले.

प्लेट सेमीफायनल दरम्यानची घटना

२९ जानेवारी म्हणजेच शनिवारी, झिम्बाब्वे आणि आयर्लंडचा संघ प्लेट सेमी-फायनल-२ मध्ये आमनेसामने होते. त्याचवेळी जमिनीवर भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर झिम्बाब्वे संघ फलंदाजी करत होता. ही धडक एवढी जोरदार होती की, पॅव्हेलियन स्टँडमध्ये बसवलेले कॅमेरे आणि स्टेडियमही हादरू लागले. सुमारे २० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

सामन्यावर परिणाम झाला नाही

मात्र, याचा सामन्यावर परिणाम झाला नाही आणि खेळ सुरूच राहिला. भूकंपाच्या वेळीही गोलंदाजी सुरूच होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्या कॅमेरामध्ये लाइव्ह मॅच कव्हर केली जात आहे तो कॅमेराही जोरात हलू लागतो. हा व्हिडीओ पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. त्याचवेळी कमेंटेटर्सही कॉमेंटेटरी करताना भूकंपाचा उल्लेख करताना आणि घाबरलेले दिसले.

(हे ही वाचा: टॉयलेट सीटच्या आतून बाहेर आला मॉनिटर सरडा, धक्कादायक Video Viral)

घटना कॅमेऱ्यात कैद

ही घटना घडली तेव्हा आयर्लंडचा फिरकी गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीज सहाव्या षटकातील पाचवा चेंडू झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटला टाकत होता. त्याचा प्रभाव यावेळी दृश्यात स्पष्टपणे दिसत होता. खेळ थांबला नाही. पुढच्या चेंडूवर चौकार मारताना बेनेटने मिडऑफवर बचावात्मक शॉट खेळला.

(हे ही वाचा: Video: बचावकार्यादरम्यान बिबट्याने केला वनअधिकाऱ्यावर हल्ला; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना)

(हे ही वाचा: ‘या’ व्यक्तीने एका हाताने पकडला मोठा ‘अ‍ॅनाकोंडा’, घटनेचा व्हिडीओ होतोय viral)

आयर्लंडने सामना ८ गडी राखून जिंकला

हा सामना जिंकण्यात आयर्लंडचा संघ यशस्वी ठरला. त्यांनी झिम्बाब्वेचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ४८.४ षटकात १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाने ३२ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video earthquake shocks felt during live match of u 19 world cup incident captured on camera ttg