बंगळूरच्या एचएसआर लेआउटमध्ये८२ वर्षाच्या सूर्य नारायण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ओळखले जात आहे. जिथे प्रशासनाचे अधिकारी-कर्माचारी आपले कर्तव्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात तिथे हे आजोबा हातात झाडू घेऊन रस्ता झाडताना दिसत आहे. नारायण यांनी आपले परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वत:च उचलली आहे. सोशल मीडियावर आजोंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक रहिवासी मधू सुधन यांनी X वर झाडू मारत असलेल्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. आजोबांच्या कृतीची त्यांनी प्रशंसा केली. आणि ऑनलाइन चर्चा सुरु झाली

वर्षानुवर्षे नारायण आणि त्यांच्या पत्नीने एचएसआर लेआउटला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि कचरा व्यवस्थापन करण्याची विनंती केली. जोडप्याला वाढत्या कचऱ्याचा ढिगार्‍यांचा आणि अस्वच्छतेचा सामना रोज करावा लागत होता. अखेर प्रशासनाची जबाबदारी नारायण यांनी आपल्या खांद्यावर निर्णय घेतला.

नारायणाच्या दिनचर्येमध्ये रोज रस्ता झाडणे, कचरा उचलणे आणि पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून तुंबलेले नाले साफ करणे हे देखील सामाविष्ट आहे. एका वृत्तवाहिनी नारायण यांनी स्पष्ट केले की,”स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी क्वचितच सफाई करण्यासाठी येतात. पावसाळ्यात अधिक साफसफाई करणे आवश्यकता असते

मधु सुधन यांची पोस्ट येथे पहा:

हेही वाचा – “अहो काकू… हे काय करताय?” भररस्त्यात ठेवली खुर्ची, त्यावर ठेवला मोबाईल अन् बिनधास्तपणे नाचू लागली महिला; Viral Video पाहून संतापले नेटकरी

u

येथे व्हिडिओ पहा:

नारायणच्या निःस्वार्थ कृत्याचा व्हिडिओ सर्वत्र लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा-“आयुष्य म्हणजे खेळ नाही!” ट्रेनखाली धावत्या चाकांच्यामध्ये बसून तरुणाने केला धोकादायक प्रवास, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

बंगळुरूचे रहिवासी आता चांगल्या प्रशासनासाठी आवाहन करत आहेत, अशी आशा आहे की सूर्य नारायणच्या निःस्वार्थी कृत्यांमुळे नागरिक आणि सरकार दोघांनाही त्यांच्या समुदायांची जबाबदारी घेण्याची प्रेरणा मिळेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video elderly bengaluru man sweeps streets to keep locality clean internet applauds snk