Viral Video Today: हत्ती हा प्राणी खऱ्या अर्थाने एक बेस्ट कॉम्बो आहे. प्रचंड देह, बलवान असूनही हत्तीचा गोंडसपणा अगदी कुणालाही भुरळ घालेल असा असतो. तुम्ही कधी हत्तीचं पिल्लू पाहिलं असेल तर नक्कीच हे आधीचं वाक्य तुम्हालाही पटलं असेल. पण विचार करा हे गोजिरवाणे वाटणारे गजराज एखाद्याच्या अंगावर येऊन बसले तर… ? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये हत्तीच्या बाळाचा खेळ पाहायला मिळत आहे. पर्यटकाच्या पार अंगावर बसून हे छोटे गजराज आपले लाड करून घेत आहेत. एका वेळेला तर हत्तीच्या वजनाने हा पर्यटक पार दाबला जातो पण तरीही हत्तीचं बाळं मात्र आपल्याच धुंदीत रममाण दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर ‘naturre’ या पेजवर व्हिडीओग्राफर ‘andy_malc’ याने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यात हॅपी टाइम, तुम्हाला या हत्तीसोबत खेळायला आवडेल का?” असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक हत्तीचं बाळ खोडकर मूड मध्ये दिसत आहे, जेव्हा पर्यटक त्याला भेटण्यासाठी येतो तेव्हा हे बाळ त्याला कडकडून मिठी मारत, आता या पेलणे मारलेली मिठी जरी प्रेमाची असली तरी सहजीच्या त्याच्या शक्तीने तो माणूस जमिनीवर पडतो आणि मग हे पिल्लू पर्यटकांच्या अंगावर बसून खेळू लागतं. भार सहन न झाल्याने काही वेळा हत्तीच्या बाळाला बाजूला करण्याचा प्रयत्न हा पर्यटक करताना दिसतो मात्र ते पुन्हा पुन्हा उठून त्याच्या अंगावर जाऊन बसत आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

हत्तीच्या बाळाचे लडिवाळ खेळ

Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह

आतापर्यंत या व्हिडिओला २ लाख १५ हजाराहून अधिक व्ह्यूज व १६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. आपल्याला हा व्हिडीओ हत्तीच्या आनंदाच्या बाजूने पाहताना गोड गोंडस वाटतो मात्र या बाळाच्या मस्तीत खाली पडलेल्या माणसाला मात्र काहीश्या वेदना होताना दिसत आहेत. संबंधित व्यक्तीला कुठलीही दुखापत झाली नसली म्हणजे मिळवलं पण तूर्तास तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.