scorecardresearch

Video: कोंबडीच्या पिल्लाने हत्तीला दमवलं, चिखलात पडला.. स्वतःचं टेन्शन विसरायला लावतील ‘ही’ दोघं

Animal Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, दुर्दैवाने बहुतांश व्हिडीओमध्ये नकारात्मकता भरभरून असते पण..

Video: कोंबडीच्या पिल्लाने हत्तीला दमवलं, चिखलात पडला.. स्वतःचं टेन्शन विसरायला लावतील ‘ही’ दोघं
स्वतःचं टेन्शन विसरायला लावतील 'ही' दोघं (फोटो: इंस्टाग्राम)

Animal Viral Video: बलाढ्य प्राणी पण गोंडस असू शकतात याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हत्ती. बुद्धिदाता गणपतीचे प्रिय वाहन अशी ओळख असणारे गजराजही बुद्धिवान प्राणी म्हणून ओळखले जातात. बुद्धी- शक्ती सहित हत्ती हा दिसायलाही गोड असतो. आजवर आपण पाहिलेले अनेक कार्टून्स याची साक्ष देतील. अशाच एका गोंडस हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हत्ती एका कोंबडीच्या पिल्लाला पकडण्यासाठी धावताना दिसत आहे. धावता धावता असं काही होतं की तुम्हाला हत्ती आणि कोंबडी दोघांच्या पिल्लांची काळजी वाटेल.

@Elephantloveyou या इंस्टाग्राम पेजवर हा हत्तीच्या बाळाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या हत्तीचं नाव ल्यूना असल्याचे समजतेय. आधी ल्यूना केकची वाट बघत होता, चिखलात खेळत होता आणि अचानक तिथे एक कोंबडीचं पिल्लू आलं आणि मग.. असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओचा गोडवा पाहून तुम्हीही Aww म्हणण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.

तुम्ही बघू शकता की हत्तीच्या बाळाच्या पुढ्यात जसं कोंबडीचं बाळ येतं तसं आधी ल्यूना थांबतो आणि मग त्या पिल्लाकडे बघून धाव घेतो. पिल्लूही हे बघता आधी दचकून पळू लागतं. कोण कोणाला चकवा देणार हा खेळ सुरु असताना हत्तीचं पिल्लू चिखलात पडतं आणि मग तिथेच खेळत राहतं.

हत्ती आणि कोंबडीच्या पिल्लाची मस्ती

हे ही वाचा<< Video: तापलेल्या तेलात तळायला टाकलेली मच्छी जिवंत झाली; शेफच्या हातावर तेल उडवलं, अन् शेवटी…

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी बरेच खुश झाले आहेत. किती गोड या कमेंट्सचा तर या व्हिडिओवर वर्षाव झाला आहे. काहींनी नटखट हत्तीच्या खेळकर स्वभावाचे कौतुक केले आहे तर काही जण कोंबडीच्या पिल्लाच्या चपळाईने चकित झाले आहेत. रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, दुर्दैवाने बहुतांश व्हिडीओमध्ये नकारात्मकता भरभरून असते पण अशावेळी हा गोंडस व्हिडीओ तुमचाही दिवस आनंदी करेल. कसा वाटला हा व्हिडीओ हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या