पारंपारिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे होत चालले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता अन जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय असून, सेंद्रिय शेतीतून (Farming) कमी श्रमात देखील कोणत्याही हंगामात आधुनिक आंतरराष्ट्रीय रेशीम शेतीतून नवीन रोजगार मिळू शकतो. इगतपुरी तालुक्यातील (Nashik) कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव यांनी हे खरे करून दाखवले आहे.

सखाहरी जाधव यांनी ड्रीपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे. साधारण तीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जात आहे.

(हे ही वाचा: घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video)

(हे ही वाचा: नवरीने रागाने वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात फेकली आणि…; बघा हा Viral video)

तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात ५०० ते ६०० रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो. दरमहिन्याला साधारण १ लाख ८० हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे. रेशीम पीक प्रयोगामुळे या वर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला ८ ते ९ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार देखील सखाहरी जाधव यांना मिळाला आहे.