Video Fast speed Car Enters Saloon Man Accident By seconds Shocking Viral Clip Will Terrify You | Loksatta

Video: आयुष्य असं संपेल वाटलंच नाही.. सलूनमध्ये शिरली भरधाव कार, एका सेकंदात ग्राहकासह जे घडलं..

Viral Video Shocking Accident: भरधाव कार चक्क सलूनमध्ये शिरून ग्राहकांना धडकण्याची हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आणत आहे.

Video Fast speed Car Enters Saloon Man Accident By seconds Shocking Viral Clip Will Terrify You
Video: आयुष्य असं संपेल वाटलंच नाही.. सलूनमध्ये शिरली भरधाव कार (फोटो:ट्विटर)

Viral Video Shocking Accident: असं म्हणतात, काळाच्या मनात जे व्हायचं असतं ते होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. कित्येक वेळ मृत्यूच्या दाढेतून सुटून आलेली माणसे आपण पाहिली आहेत तर कितीतरी वेळा अगदी सुरक्षित वातावरणातही लोकांनी आपला जीव गमावला आहे. असाच काहीसा अत्यंत विचित्र अपघात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार अपघाताचा हा व्हिडीओ आहे पण विशेष म्हणजे रस्त्यावर किंवा फार फार तर फूटपाथवरही हा अपघात न होता चक्क एका केस कापण्याच्या सलूनमध्ये घडला आहे. भरधाव कार चक्क सलूनमध्ये शिरून ग्राहकांना धडकण्याची हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आणत आहे.

आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की, ही संपूर्ण घटना सलूनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात पाच पुरुष दाखवले आहेत, दोन केस कापत आहेत आणि दाढी करत आहेत तर एक माणूस बाकावर बसलेला आहे. इतक्यात अचानक कुठूनतरी मोठा आवाज आल्याने सर्व जण प्रवेशद्वाराकडे पाहू लागतात बाकावर बसलेला माणूस उठून उभा राहणार इतक्यात एक पांढरी कार सलूनमध्ये वेगात शिरते आणि धडकते. यावेळी बाकावर बसलेल्या माणसाला सर्वात जास्त जोराचा धक्का बसतो.

आयुष्य असं संपेल वाटलंच नाही..

हे ही वाचा<< Video: चोरीचा ट्र्क भरधाव वेगात जाताना रस्त्यातच झाला पलटी; पोलीस येताच ट्र्कने उलटी उडी घेतली अन्..

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजलेले नाही. व्हिडीओवरून साधारण अंदाज येऊ शकतो की तेव्हा सलूनमधील सर्वांवरच खूप मोठा मानसिक व शारीरिक धक्का आघात झाला असणार. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून याला नशीब म्हणायचं की कर्म असं म्हंटल आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:54 IST
Next Story
बापरे! रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असतानाच डॉक्टरांमध्ये जुंपली, ऑपरेशन थिएटरचा Video पाहून धडकीच भरेल