कोणतीही मॅच पाहताना त्या खेळाचे चाहते त्यात रंगून जातात. अगदी सगळं विसरून त्यांचे फक्त त्या खेळात लक्ष असते. खेळादरम्यान स्कोर बोर्डवर होणाऱ्या चढ उताराप्रमाणे तो खेळ पाहणाऱ्या व्यक्तीचे हावभाव सतत बदलत असलेले तुम्ही पाहिले असतील. कधी आनंदाने किंचाळताना तर कधी चिंतेने डोक्याला हात लावून बसलेल्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला मॅच पाहणाऱ्या त्याच्या वडिलांची नक्कल करत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला त्याच्या वडिलांशेजारी बसला आहे. हे दोघ मॅच पाहत आहेत. यावेळी मॅचमध्ये असे काही घडते की त्यामुळे वडील ज्या संघाला समर्थन करत असतात त्यांच्या विरुद्ध काहीतरी घडते. यावर हा चिमुकला आनंद व्यक्त करतो. पण नंतर वडिलांकडे पहिल्यावर त्याला आपण चुकीची प्रतिक्रिया दिल्याचे लक्षात येते आणि तो लगेच चिंता व्यक्त करणारी प्रतिक्रिया देतो. त्याची ही प्रतिक्रिया पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

आणखी वाचा- Viral: ट्रेन दरीतून जातानाचा हा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: करोनापासून वाचण्यासाठी या जोडप्याने केलेला भन्नाट जुगाड एकदा पाहाच

या चिमुकल्याच्या गोंडस प्रतिक्रियेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओला ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.