scorecardresearch

Video: छेड काढणाऱ्या तरुणावर भडकली गौतमी पाटील; भरकार्यक्रमात ‘त्या’ वेड्या फॅनला धु धु धुतला..

Gautami Patil Lavani Viral Video: कधी गौतमी नाचत असताना १०० लोक स्टेजवर चढून तिच्याशी लगट करू लागले होते तर कधी स्टेजवर गर्दीतूनच काठ्या फेकून मारण्यात आल्या होत्या

Video: छेड काढणाऱ्या तरुणावर भडकली गौतमी पाटील; भरकार्यक्रमात ‘त्या’ वेड्या फॅनला धु धु धुतला..
Video: छेड काढणाऱ्या तरुणावर भडकली गौतमी पाटील? भरकार्यक्रमात 'त्या' वेड्या फॅनला धु धु धुतला.. (फोटो: ट्विटर)

Gautami Patil Lavani Viral Video: गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रात घरघर पोहोचले आहे. नाक मुरडत का होईना पण गौतमीला ओळखतच नाही असं क्वचितच कोणी सांगू शकेल. गौतमीच्या एका लुकसाठी गावोगावी तुफान गर्दी होत असते. यापूर्वी एकदा तर गौतमीच्या प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू सुद्धा झाला होता. कधी गौतमी नाचत असताना १०० लोक स्टेजवर चढून तिच्याशी लगट करू लागले होते तर कधी स्टेजवर गर्दीतूनच काठ्या फेकून मारण्यात आल्या होत्या. थोडक्यात कारण काहीही असो पण गौतमीची फॅन फॉलोईंग तुफान आहे हे नक्की. असे फॅन्स कधी कधी अगदी हाताबाहेर जातात. असाच एक अनुभव अलीकडेच गौतमीला सुद्धा आला पण त्यावर तिने जी प्रतिक्रिया दिली ती बघून तिचे चाहते आता जरा घाबरूनच राहतील असे दिसतेय.

सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. अलीकडे व्हायरल या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील छेड काढणाऱ्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तीन महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. हुल्लडबाज तरुणाच्या चुकीच्या कृतीने संतप्त झालेल्या गौतमीने तरुणाला मारहाण केल्याचा दावा कऱण्यात येत आहे.

गौतमीने तरुणाला धु धु धुतला..

हे ही वाचा<< गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

दरम्यान, गौतमी पाटील हि मूळची धुळ्याची आहे. न्यूज १८ लोकमतच्या वृत्तानुसार, गौतमी २६ वर्षाची आहे. तिचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. गौतमी सांगते की तिने लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतर कलाकारांना बघून आपण लावणी शिकल्याचे गौतमी सांगते, मागील १० वर्षांपासून गौतमी या क्षेत्रात कार्यरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 10:46 IST

संबंधित बातम्या