Video Girl Creates Lag Ja Gale Extended Version Instagram Viral Song By Lata Mangeshkar Watch Here | Loksatta

Video: लग जा गले गाण्याचं ‘हे’ नवं कडवं ऐकलंत का? लता मंगेशकरांच्या गाण्याला ‘या’ तरुणीने दिला सुंदर टच

Lag Ja Gale Extended Version: सोशल मीडियावर एका तरुणीने लग जा गले या गाण्यात एक कडवं रचून व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Video: लग जा गले गाण्याचं ‘हे’ नवं कडवं ऐकलंत का? लता मंगेशकरांच्या गाण्याला ‘या’ तरुणीने दिला सुंदर टच
Video: 'लग जा गले' गाण्याचं 'हे' नवं कडवं ऐकलंत का? लता मंगेशकरांच्या गाण्याला 'या' तरुणीने दिला सुंदर टच (फोटो: इंस्टाग्राम)

Lag Ja Gale Extended Version: लता मंगेशकर यांची सर्वच गाणी आजही अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. भक्ती गीत, भावगीत ते अगदी बॉलिवूडमधील गाण्यांचा वैविध्यपूर्ण खजिना लता दीदी रसिकांसाठी ठेवून गेल्या आहेत. यातीलच एक अत्यंत सुंदर गाणं म्हणजे लग जा गले… वो कौन ठी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं लग जा गळे हे गाणं आजही नाईट आउट्सची शान मानलं जातं. अगदी रॅप, हिप हॉप, इंग्रजी गाण्यांचं क्रेझ असलेल्या तरुणाईच्या मनालाही हे गाणं भावतं. समुद्राच्या किनारी किंवा अगदी घराच्या एका आवडत्या कोपऱ्यात बसून, मंद प्रकाशात हे गाणं ऐकणं याहून दुसरं सुख नाही. याच गाण्याचे आजवर अनेक रिमेक्स व्हर्जन झाले आहेत, पण आता सोशल मीडियावर एका तरुणीने लग जा गले या गाण्यात एक कडवं रचून व्हिडीओ पोस्ट केला आहे.

@girl.with.the.guitar या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. योशिता शर्मा या तरुणीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडत आहे. योशिताने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपण लग जा गलेचं पुढचं कडवं रचण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे, या व्हिडिओच्या कमेंटबॉक्स मधील प्रतिक्रिया पाहता योशिताचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल.

२०१४ मध्ये सनम पुरीच्या म्युझिकल बँडने सुद्धा लग जा गलेचे सुंदर व्हर्जन गायले होते. या गाण्याला प्रचंड प्रेम लाभले होते आणि आता योशिताच्या व्हिडिओला सुद्धा ३८ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

लग जा गलेचं नवं कडवं

हे ही वाचा<< Video: हार्दिक पांड्याच्या पार्टीत धोनीचा जलवा; डान्स पाहून पांड्याच्या बायकोची ‘ती’ कमेंट चर्चेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांचे आणखीन एक गाणे पुन्हा ट्रेंड मध्ये आले होते. पाकिस्तानी लग्नसोहळ्यात एका तरुणीने लता दीदी यांचे मेरा दिल ये पुकारे या गाण्यावर डान्स केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी हा ट्रेंड फॉलो करून यावर व्हिडीओ पोस्ट केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 16:56 IST
Next Story
बापरे! इथे माणसांची नाही, चक्क सापांची दुनिया, ‘Snake Island’वर फिरतायेत जगातील सर्वात विषारी साप