scorecardresearch

“आईला मारू नका ना.. ” चिमुकलीची विनंती बाबांनी ऐकली नाही, शेवटी तिने रागात .. Video पाहून डोकंच धराल

Viral Video: अनेकदा आपल्या वयाच्या आधीच मुलांना प्रौढांसारखं वागावं लागतं.. आई वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करून समजूत काढावी लागते, पण…

Video Girl Slaps Dad As He Beats Mother Angry Little Kid Is Viral Shocking Family Clip Trending Online
"आईला मारू नका ना.. " चिमुकलीची विनंती बाबांनी ऐकली नाही (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video: आजपर्यंत आपण अनेक पापाच्या पऱ्या पाहिल्या असतील पण आता सोशल मीडियावर एका मम्मीच्या परीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असं म्हणतात, पालकांमध्ये भांडण झालं तर त्यात मुलांचीही फरफट होते, यामुळेच अनेकदा आपल्या वयाच्या आधीच मुलांना प्रौढांसारखं वागावं लागतं.. आई वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करून समजूत काढावी लागते. असाच काहीसा हा व्हिडीओ आहे पण यात मध्यस्थी करताना चिमुकलीने थेट वडिलांच्याच कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. नेमकं एवढं वडिलांनी केलं तरी काय होतं पाहुयात..

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक गोड चिमुकली आपल्या वडिलांना समजावत आहे, तुम्ही मम्मीला मारू नका मी सांगतेय ना असंही ती बोलताना दिसते. पण मुलीला अजून चिडवण्यासाठी तिचे बाबा बाजूला बसलेल्या स्वतःच्या बायकोला गंमतीत एक फटका मारतात, खरंतर हा एकूण प्रकार गंमतीतच घडत असतो पण आईला मारल्याचं पाहून चिमुकली अशी भडकते की ती थेट बाबांच्याच कानाखाली मारते. एवढ्यावरच थांबत नाही तर ती पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये वडिलांना अशा शब्दात बडबडते की रडावं की हसावं हेच कळत नाही.

Video: बाबांच्याच थेट कानाखाली लगावली..

हे ही वाचा<<मास्टरशेफ बनायला गेली मीम बनून आली! पाकिस्तानच्या ‘या’ ‘बिर्याणी गर्ल’चा Video चुकूनही मिस करू नका

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत याला हजारो व्ह्यूज आहेत. अनेकांनी या गोड चिमुकलीचं आईवर किती प्रेम आहे हे बघून कौतुक केलं आहे. तर काहींनी आईचं प्रेम दिसतं पण वडिलांवर हात उचलणे हे सुद्धा चुकीचे आहे असेही म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 09:54 IST
ताज्या बातम्या