Viral Video: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो. पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जायचे. मात्र आता अनेकजण डान्सकडे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराचा व्यायाम होण्यासाठी शिवाय प्रसिद्धी आणि पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत.
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणींच्या गृपच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ मणिपूरमधील एका निसर्गरम्य परिसरातील आहे. रस्त्यावर धुके दिसत असून या मनमोहक वातावरणामध्ये सहा तरूणी ‘बरसो रे मेघा मेघा’ हा गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. यावेळी त्यांनी या गाण्यावर शोभेल असाच पोशाखही परिधान केलेला आहे. त्यांच्या सुंदर डान्स स्टेप्स आणि मनमोहक अदा पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @thaja23_lisa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत २६ मिलियन व्ह्यूज आणि एक मिलियनहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी नाचलात” तर एका युजरने लिहिलेय, “क्या बात है मैत्रिणी असाव्या तर असा” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई जबरदस्त” एक युजर लिहितो, “आयुष्यामध्ये आनंद खूप महत्त्वाचा आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर नृत्य सादरीकरण आहे”
