Viral Video : जंगलात आराम करत होता सिंह, मागून आलेल्या कोल्ह्याने खेचली शेपूट अन्…

जंगलाचा राजा सिंहाशी घेतला ‘पंगा’…

(वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रिनशॉट)

सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ नेटकरी आवडीने बघतात. जंगलाचा राजा सिंह याची चेष्टा करण्याची तर कोणी हिंमतही करु शकत नाही. कारण सिंहाची चेष्टा करणं म्हणजे मृत्यूला बोलावणं हे सर्वच प्राण्यांना समजतं. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक खोडकर कोल्हा झोपलेल्या सिंहाची चक्क शेपूट खेचताना दिसतोय.

हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय. भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये जंगलात एका झाडाखाली सिंह आराम करताना दिसत आहे. तेवढ्यात मागून चोरपावलांनी कोल्हा येतो आणि सिंहाची शेपूट खेचून पळून जातो. दचकून सिंह उठतो, इकडे तिकडे बघतो पण सिंह उठेपर्यंत कोल्हा तिथून पसार झालेला असतो.


हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ‘लाइक’ केला जातोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video goes viral of jackal bites sleeping lion tail see what happens next sas

ताज्या बातम्या