scorecardresearch

Video: नवरोबांची कंबर मोडून ‘ती’ उड्या मारू लागली; मंडपाऐवजी हॉस्पिटलला पोहोचली वरात, असं घडलं तरी काय?

Viral Video: सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं वेड माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतं. या वेडापायी अनेकजण आयुष्यभर वेगवेगळे पराक्रम करून पाहत असतात.

Video: नवरोबांची कंबर मोडून ‘ती’ उड्या मारू लागली; मंडपाऐवजी हॉस्पिटलला पोहोचली वरात, असं घडलं तरी काय?
Video: नवरोबांची कंबर मोडून 'ती' उड्या मारू लागली; (फोटो : इंस्टाग्राम)

Husband Wife Viral Video: सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं वेड माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतं. या वेडापायी अनेकजण आयुष्यभर वेगवेगळे पराक्रम करून पाहत असतात. रस्त्यावर कार- बाईकचे विचित्र स्टंट करणारे तुम्हीही पाहिले असतील पण कधी घोडीवर स्टंट पहिले आहेत का? सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तुमची ही इच्छाही पूर्ण करेल. स्वतःच्या लग्नात भन्नाट एंट्री घ्यायच्या हट्टाने या व्हायरल व्हिडिओमधील नवरदेवांनी घोडीवर असा काही प्रताप केला की बघणारे हसून हैराण झाले आहेत. आपण पाहू शकता की घोडीवर बसून हे नवरोबा बाईक उडवतात त्याप्रमाणे स्टंट करू पाहतात पण पुढे जे काही घडतं ते बघून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

इंस्टाग्राम वर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक वरात बघू शकता. या वरातीत घोडीवर बसलेले नवरोबा एंट्री घेतात, सुरुवातीला तर हे नवरोबा मस्त रुबाबदार दिसत आहेत पण काहीच वेळात तो घोडीला उडी मारण्यासाठी खुणावतो. नवऱ्याचा मान राखून घोडी उडी मारायला जाते आणि त्या मातीत घसरून खाली पडते. या घोडीसह नवरोबा पण धाडकन जमिनीवर कोसळतात, एकीकडे तुम्ही हा व्हिडीओ बघून आपलं हसू कंट्रोल करू शकणार नाही पण कदाचित या नवरोबाला जबर दुखापत झालेली असू शकते.

आणि मंडपाच्या आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले नवरोबा..

हे ही वाचा<< Video: बाबा रे पळ! भरमंडपात नवरीने नवऱ्यावर बंदूक रोखून धरला नेम; हातात कागद देत म्हणली, “आता या क्षणी..”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून याला लाखो व्ह्यूज व हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट करून नवऱ्याच्या फजितीवर हसून प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी सुद्धा लग्नातील अशाच एंट्रीचे फसलेले प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. म्हणूनच मंडळी हे सगळे व्हिडिओ लक्षात ठेवूनच भविष्यात तुमच्या खास दिवसासाठी नीट प्लॅन कराल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या