scorecardresearch

भररस्त्यात उडत आला भलामोठा दगड आणि बाइकस्वाराला उडवून नेलं; Video शिवाय विश्वासच बसला नसता

Shocking Accident Video: बाईक चालवताना हवेतून भल्यामोठ्या दगडासारखी वस्तू समोरून त्याच्या डोक्यावर आदळली. आणि आपल्यासह त्या बाईक चालकाला..

भररस्त्यात उडत आला भलामोठा दगड आणि बाइकस्वाराला उडवून नेलं; Video शिवाय विश्वासच बसला नसता
Video: भररस्त्यात उडत आला भलामोठा दगड आणि बाइकस्वाराला उडवून नेलं;(फोटो: ट्विटर)

Viral Video Today: तरुणाईला बाईकचे किती वेड असते हे काही नव्याने सांगायला नको. एखादी बाईक रस्त्यावर बाजूने गेली की आपसूकच अनेकांचे डोळे त्या दिशेने वळतात. बाईकचा वेग कितीही असला तरी अनेकांना त्या गाडीच्या नावापासून फीचर पर्यंत सगळं काही एक झटक्यात समजतं, इतकं लोकांना बाईकचं क्रेज असतं. पण म्हणतात ना प्रत्येक चांगली गोष्ट ही धोक्याची एक बाजू असते. तसेच जर बाईक चालवताना नीट काळजी घेतली नाही तर जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. आजवर तुम्ही वेगाने गाडी चालवताना किंवा तोल गेल्याने झालेले अपघात पाहिले असतील पण समजा एखादा माणूस बाईक चालवतोय आणि अचानक हवेतून काहीतरी उडत आलं आणि त्या माणसाला आदळलं तर..

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक दुचाकीस्वार त्याच्या बाईकच्या सीटवरून हवेत फेकला गेला. बाईक चालवताना हवेतून भल्यामोठ्या दगडासारखी वस्तू समोरून त्याच्या डोक्यावर आदळली. आणि आपल्यासह त्या बाईक चालकाला उडवून घेऊन गेली. चालकाशिवाय बाईक काही सेकंद पुढे गेली आणि खाली पडली. हे सर्व जर रेकॉर्ड झाले नसते तर कदाचित यावर विश्वासही बसला नसता. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

हवेतून भलामोठा दगड आला

हे ही वाचा << Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..

काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका बाईक चालकाच्या गल्य्यात दोरखंड अडकल्याने तो भररस्त्यात बाईकवरून उलटा खेचला गेल्याचे दिसले होते. बाजूने जाणाऱ्या ट्र्कला बांधलेला दोरखंड सैल होऊन हा अपघात झाला होता. हे अपघात अनपेक्षित असले तरी मागील काही काळात बाईकवर स्टंट करतानाही काही जण संकटात आले आहेत. भिवंडी व नंतर तामिळनाडूमध्ये काही जोडपी असे विचित्र चाळे करताना बाईक चालवतानाचे व्हिडीओ सुद्धा धक्कादायक आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 16:37 IST

संबंधित बातम्या