बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा! बाळ समोर असताना… Video पाहून लोकं म्हणतात “अटक करा”

Viral Video: तुम्ही हा व्हिडीओ पाहताना एक एक करून या जोडप्याच्या बेजबाबदारीचा व नियम भंग करणाऱ्या कृतीची यादी बनवू शकता.

Video Husband Wife Shameless Act In Public In Front Of Child Helps Smoke People are Demanding Arrest
बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Husband Wife Bike Viral Video: भारतात रस्ता सुरक्षा हा मुद्दा अनेकदा हसण्यावरीच घेतला जातो. रस्ते अपघातात लाखो प्रवासी आजवर जखमी झाले आहेत. हजारोंना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही हेल्मेट न घालण्यापासून ते ट्रिपल सीट जाणे, गाडी चालवताना फोनवर बोलणे असे प्रकार आपल्याकडे सर्रास घडतात. अलीकडे इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात एका नवरा बायकोने सर्व नियमांना धाब्यावर बसवले आहे पण एवढंच नाही भररस्त्यात बाईकवर नवर्याच्या मागे बसलेल्या बायकोने असे काही केले आहे की नेटकरी प्रचंड भडकले आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर होताच तुफान व्हायरल झाला आहे. बाईकवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबाच्या शेजारी असलेल्या कारमधून कोणीतरी व्हिडिओ शूट करत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहताना एक एक करून या जोडप्याच्या बेजबाबदारीचा व नियम भंग करणाऱ्या कृतीची यादी बनवू शकता. पत्नी, पती आणि त्यांच्या मुलाने हेल्मेट घातलेले नाही ही त्यांची पहिली चूक. तर दुसरं म्हणजे चक्क सार्वजनिक ठिकाणी प्रवासात ही व्यक्ती सिगरेट ओढताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या मागे बसलेली त्याची बायकोच आपल्या पतीला यासाठी मदत करत आहे.

तुम्ही बघू शकता की मुलगाबाईकच्या टाकीवर बसला आहे तर बायको साडी नेसून नवऱ्याच्या मागे बसली आहे. नवरा एका बाजूला वळतो आणि त्याची बायको त्याला सिगारेट देते. बाळाचे लक्ष नसले तरी पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्याच्यापर्यंत सुद्धा हा विषारी धूर पोहोचत असणारच. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८०७ व्ह्यूज मिळाले आहेत.

Video: नवरा बायको झाले बेभान…

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये दोन जोडप्यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; Video पाहून नेटकरी म्हणतात,”लाज सोडली पण…”

आम्ही आमच्या वाचकांना असा सल्ला देऊ शकतो की असे स्टंट रस्त्यावर कधीही प्रदर्शित करू नका. निष्काळजीपणामुळे आपण स्वतःसह इतरांचे सुद्धा आयुष्य धोक्यात आणू शकता. दरम्यान हा व्हिडीओ काहींनी मजेशीर पद्धतीने पाहत बाईकवर नव्हे पण सिगारेट ओढायला मदत करणारी बायको मिळावी अशीही इच्छा व्यक्त केली आहे. तर बहुतांश नेटकऱ्यांनी या जोडप्याला ऑनलाईन प्रचंड सुनावले आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 09:44 IST
Next Story
“मी सुशिक्षित, माझे निर्णय…”; मुलीचं उत्तर ऐकून संतापले प्राध्यापक वडील, मुलीची गोळी झाडून हत्या केली अन्…
Exit mobile version