Animals Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्राण्यांची अनपेक्षित मैत्री, प्रेम दाखवतात तर काही मध्ये प्राण्यांची जोरदार भांडणं पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून अगदी Aww म्हणायला लावतात तर काही अक्षरशः अंगावर काटा आणतात. पण आता व्हायरल होणारा व्हिडीओ या सगळ्या भावनांचे मिश्रण आहे. तुम्हाला बुचकळ्यात पाडेल पण त्याच वेळी “कसलं गोड आहे हे” असं म्हणायला लावेल असा एक व्हिडीओ भारतीय वन्याधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. कॅप्शननुसार हा व्हिडीओ IIM कोलकाता मधील असल्याचे समजत आहे.
तुम्ही बघू शकता की या व्हिडिओमध्ये दोन भल्यामोठ्या मगरी उभ्या राहून एकमेकींशी चर्चा करत आहेत. अर्थात नेमक्या त्या मिठी मारून उभ्या आहेत की एकमेकींचे हात धरून भांडत आहेत हे काही लक्षात आलेलं नाही पण त्यांची ही उभी राहण्याची स्टाईल मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला होता “भांडणं कशी मिटवायची हे शिकवणारा व्हिडीओ IIM कोलकाता मधील पहाटेचे दृश्य…” असे त्यांनी कॅप्शन दिले होते.
Video: मगरी उभ्या राहिल्या
हे ही वाचा<< “आईला मारू नका ना.. ” चिमुकलीची विनंती बाबांनी ऐकली नाही, शेवटी तिने रागात .. Video पाहून डोकंच धराल
दरम्यान, हा व्हिडिओ काही तासांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. शेअर केल्यापासून, क्लिपला जवळपास २,१०० व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या. “आता IIM च्या बागेत व्यवस्थापन वर्ग भरले आहेत”, “फेब्रुवारी संपला पण मगरींचे प्रेम संपलेले नाही” अशा मजेशीर कमेंट करून नेटकरी चांगलीच मज्जा घेत आहेत.