ऐतिहासिक बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी, १ ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. परंतु, याआधी आपण मुंबईत बीडीडी चाळी का उभारण्यात आल्या याचा इतिहास जाणून घेऊया…

प्लेगच्या कोपानंतर ब्रिटिशांनी शहर नियोजन केलं म्हणून बीआयटी चाळी, बीडीडी चाळी उभ्या राहिल्या आणि गरीबांनाही रोगराईमुक्त जीवन जगता आलं.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे रहिवासी १६० चौ. फुटांच्या घरातून ५०० चौ. फुटांच्या घरात जातील, तर दुसरीकडे म्हाडाला विक्रीसाठी ८ हजार १२० घरे उपलब्ध होणार आहेत. ही सर्व घरे केवळ मध्यम आणि उच्च गटासाठीच आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्विकासाद्वारे म्हाडाला मोठ्या संख्येने व्यावसायिक क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथे दुकान, कार्यालय घेण्याची संधीही मिळेल.