Viral Video: सिंहाने केला बिबट्यावर जबरदस्त हल्ला, एकाच फटक्यात केली ‘अशी’ वाईट अवस्था!

सिंह आणि बिबट्याच्या भांडणाचा हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

lion-attack-on-leopard
व्हायरल व्हिडीओ (फोटो: wild_animal_shorts_/Instagram)

Animal Fight Video: प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होते. विशेषत: प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ बघायला नेटीझन्स आवडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (viral video of social media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंहाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा (Lion Attack on Leopard) आहे. सिंह अचानक येऊन त्याच्यावर हल्ला करत असताना एक बिबट्या आरामात पडून असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर जे झाले ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या आरामात झोपलेला दिसत आहे. तेवढ्यात एक सिंह अचानक धावत येतो आणि बिबट्यावर हल्ला करतो. यामध्ये आणखी प्राणी तिथे जमतात, पुढच्याच क्षणी एक सिंहीणही तिथे येते. तिला बघून सिंहाला राग येतो आणि मग बघा सिंह एका झटक्यात बिबट्याला असं काही करतो की बिबट्याची अवस्था एवढी बिकट होते की तो उभाही राहू शकत नाही.

(हे ही वाचा: पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी शेतकऱ्याने बनवले ‘अनोखे यंत्र’, video पाहून मोठे अभियंतेही होतील थक्क!)

(हे ही वाचा: Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ wild_animal_shorts_ नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सिंह आणि बिबट्याच्या भांडणाचा हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर अनेक हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. या व्हिडीओवर नेटीझन्स कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले – गरीब बिबट्या. दुसर्‍याने लिहिले – सिंहिणीचे आगमन सिंहाला आवडले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video lion attacks a leopard fights video goes viral on social media ttg

Next Story
Video : म्हशींच्या गोठ्यात विसावला बिबट्या; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
फोटो गॅलरी