Video: ३६ इंचाचा नवरदेव ३१ इंचाची नवरी; जळगावात फार पडला अनोखा विवाह सोहळा

जळगावातील या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडीयावर होत आहे.

small groom bride

जळगावात सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नात लोकांची गर्दी ही खाण्या-पिण्यासाठी नव्हती तर नवरदेव आणि नवरीसोबत सेल्फी घेण्यासाठी होती. आता तुम्ही म्हणाल की असं काय होतं या लग्नात आणि नवरदेव आणि नवरीत. तर या लग्नाची खासियत म्हणजे नवरदेव आणि नवरीची उंची.

मंगलकार्यात जागा पडली अपुरी

३६ इंच उंचीच्या संदीप सपकाळेचं ३१ इंच उंची असलेल्या उज्वलासोबत शुभमंगल पार पडलं. या लग्नातील मुख्य आकर्षण असलेल्या नवरदेव आणि नवरीला पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली की मंगलकार्यालयात जागा अपूरी पडत होती. या नवदांपत्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

(हे ही वाचा: Viral Video: सिंहाने केला बिबट्यावर जबरदस्त हल्ला, एकाच फटक्यात केली ‘अशी’ वाईट अवस्था!)

मिळत न्हवती मुलगी

नवरदेव संदीप संजय सपकाळे हा शिक्षित तरुण शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरात राहतो. तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत कामाला आहे. परंतु त्याची उंची कमी असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. अखेर अनेक वर्षांनी त्यांना उज्वलाचा निरोप आला आणि त्यांचा शोध संपला. संदीप हा ३६ इंच उंचीचा असून त्याची जोडीदार उज्वला ही ३१ इंच उंचीची आहे. उज्वला ही मुळची धुळ्याची आहे.

(हे ही वाचा: बापमाणूस… मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे Video झाला व्हायरल)

(हे ही वाचा: पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी शेतकऱ्याने बनवले ‘अनोखे यंत्र’, video पाहून मोठे अभियंतेही होतील थक्क!)

संदीप आणि उज्वला दोघांचीही उंची कमी असल्याने लग्न जमत नव्हतं. परंतु दोघांना एकमेकांची साथ मिळाली आणि वाजत गाजत लग्नसोहळा पार पडला. आनंदाने दोघांच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले. लग्नात संदीप आणि उज्वला अतिशय सुंदर दिसत होते. साधारण कुटुंबातल्या संदीप आणि उज्वलाच्या लग्नात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्या दोघांच्या उंचीमुळे या लग्नाची खानदेशात चांगलीच चर्चा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video maharashtra jalgaon couple takes wedding vows netizens bless the couple ttg

Next Story
जगातील सर्वांत वयस्कर कुत्र्याची Guinness World Records मध्ये नोंद; जाणून घ्या त्याचे वय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी