scorecardresearch

Video: भडकलेल्या ज्वालामुखीत माणूस पडला तर.. थरकाप उडवणारा ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात कैद

Viral Video: सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला जर माणूस ज्वालामुखीच्या लावा रसाने भरलेल्या तलावात पडला तर काय होईल हे पाहायला मिळत आहे.

Video: भडकलेल्या ज्वालामुखीत माणूस पडला तर.. थरकाप उडवणारा ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात कैद
Video: भडकलेल्या ज्वालामुखीत माणूस पडला तर.. थरकाप उडवणारा 'तो' क्षण कॅमेऱ्यात कैद (फोटो: ट्विटर)

Viral Video: आपल्यापैकी अनेकांनी चित्रपट किंवा माहितीपटांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक पाहिला असेल. आपल्यापैकी काहींनी लहानपणी शाळेत ज्वालामुखीचे मॉडेल विज्ञान प्रदर्शनात बनवला असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी व्यक्ती जर खरोखरच ज्वालामुखीत पडला तर… विचार करूनच थरकाप उडतो ना? सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला जर माणूस ज्वालामुखीच्या लावा रसाने भरलेल्या तलावात पडला तर काय होईल हे पाहायला मिळत आहे.

ट्विटरवर एक जुना व्हिडीओ नव्याने शेअर करण्यात येत आहे. यामध्ये ३०-किलोग्राम सेंद्रिय कचऱ्याचा मानवी शरीराच्या स्वरूपातील पुतळा लाव्हा रसाच्या तलावात फेकण्यात आला आहे. इथिओपियामधील सक्रिय ज्वालामुखी एर्टा अलेमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून याला ८० लाखाहून अधिक व्ह्यूज व लाखभर लाईक्स आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, वितळलेल्या लावावर तयार होणारा राखेचा थर दिसत आहे जेव्हा मानवी रूपातील कचऱ्याचा गोळा या राखेवर आदळतो तेव्हा लाव्हा रसामुळे कचऱ्याचा पुतळा वितळू लागतो. जसा हा पुतळा तलावात बुडू लागतो तसे लाव्हा रसाचे बुडबुडे वर येऊ लागतात. ज्वालामुखी हा विषारी वायू बाहेर फेकतो त्यामुळे सक्रिय ज्वालामुखीच्या जवळच्या भागात जाण्यासही विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक हा प्रयोग करण्यात आला होता. आपण असे प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये.

ज्वालामुखीत माणूस पडला तर..

हे ही वाचा << आनंद महिंद्रा, तुम्ही भारतीय जावई का नाही निवडला? नेटकरी टोमणा मारायला गेला अन फसला, महिंद्रा म्हणतात..

दरम्यान, या प्रयोगाचा एक व्हिडीओ फोटोव्होल्कॅनिका या युट्युब अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. लाव्हा रसाच्या तलावात माणूस बुडू शकतो का की शरीर लाव्हामुळे पृष्ठभागावर तरंगत राहील हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. जर उंचीवरून पडून एखादी वस्तू लाव्हा रसाच्या तलावात पडली तर ती बुडू शकते हे प्रयोगावरून सिद्ध होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 14:57 IST

संबंधित बातम्या