scorecardresearch

Video: जंगलाचा राजा सिंहाला आधी Kiss केलं अन मग..नेटकरी म्हणतात ‘तू’ जग जिंकलास मित्रा!

Viral Video Today: आता तुम्हाला वाटत असेल की हे एखादं ग्राफिक किंवा टेक्नॉलजी वापरून केलेलं दृश्य असू शकतं पण नाही मंडळी हा माणूसही खरा आहे, सिंहही आणि…

Video: जंगलाचा राजा सिंहाला आधी Kiss केलं अन मग..नेटकरी म्हणतात ‘तू’ जग जिंकलास मित्रा!
Video: जंगलाचा राजा सिंहाला आधी Kiss केलं अन मग..नेटकरी म्हणतात 'तू' जग जिंकलास मित्रा! (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video Today: एखाद्या माणसाला जीव लावायला जावं तर प्रत्येक वेळी तुम्हाला तेवढंच प्रेम पुन्हा मिळेल असं नाही पण तेच एखाद्या प्राण्याला साधं दोन घास खाऊ घातलं,मायेने डोक्यावरून हात फिरवला तर त्याच्या दुप्पट प्रेम हे प्राणी आपल्याला परत करतात. सोशल मीडियावर याची अनेक उदाहरणे व्हायरल होत असतात. अर्थात कुत्र्या मांजरांच्या बाबत हे नियम लागू होतात, सिंह, वाघ यांना आपण आंजरायला गोंजारायला जाणं हे वेडेपणाचं ठरू शकतं. पण म्हणतात ना जग इतक्या वेगाने बदललंय की कुठल्या वेळी काय घडेल याची अंधुक चाहूलही अनेकदा लागत नाही. असाच काहीसा प्रकार आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये माणूस चक्क सिंहाला किस करताना दिसत आहे, बसला ना धक्का?

आपण या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक माणूस एका भल्या मोठ्या सिंहाला प्रेमाने मिठी मारताना, त्याचे लाड करताना दिसत आहे. यावेळी हा माणूस मध्येच या सिंहाच्या नाकावर किस करतो. हा माणूस अत्यंत भाग्यवान असणार की इतक्या जवळून त्याला सिंह पाहता येत आहे आणि मुख्य म्हणजे सिंहाला हा माणूस आवडत आहे. अशा पद्धतीच्या कमेंट या व्हायरल व्हिडिओवर दिसत आहेत.

अन त्याने सिंहाला केलं किस

हे ही वाचा<< Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

आता तुम्हाला वाटत असेल की हे एखादं ग्राफिक किंवा टेक्नॉलजी वापरून केलेलं दृश्य असू शकतं पण नाही मंडळी हा माणूसही खरा आहे, सिंहही खरा आणि व्हिडिओही १०० टक्के खरा आहे. इंस्टाग्रामवर @lionlovershub या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल ३० लाखाहून अधिक व्ह्यूज व २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. जेव्हा तुमच्या बेस्टफ्रेंडला तुमच्यासह कडल करायचं असतं तेव्हा.. असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या