Man Making Reel Crushed To Death By Elephant: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं. जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या हत्तीने व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणाला चिरडून ठार केले आहे. या तरुणाचा पंधरा सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून लोकवस्तीत आलेल्या एका हत्तीने व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणाला चिरडून ठार केले. त्यानंतर, वनविभागाचे कर्मचारी व लोकांनी हत्तीला पळवून लावले. हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. हत्ती शेताजवळील दाट झाडी आणि झुडपांमध्ये लपून राहिला असताना हत्तीला लोकवस्तीपासून दूर ठेवण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. पथकाने दक्ष राहून गावकऱ्यांना हत्तीजवळ जाण्यापासून रोखले.

youngster dies during bike stunts
बाईकवर स्टंट करणं जीवावर बेतलं! रील काढण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू
nashik, trailer break fail
Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
Malegaon, daughters, died,
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू
Mumbai, Murder, old mother,
मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या
worli hit and run case
Worli Hit and Run Case : प्रदीप नाखवांचा हा आक्रोश पाहून तुमचंही मन हेलावून जाईल! म्हणाले, “मी बोनेटवर हात मारला, पण…”
Pune Hit and Run Two on-duty policeman hit by speeding car
पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

पंधरा सेकंदात झाला मृत्यू

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक हत्ती शेतात दिसत आहे. यावेळी तो फोटो काढण्यासाठी हत्तीच्याजवळ जातो आणि तिथेच घात होतो. हत्तीने तरुणाला लाथ मारली आणि त्याला पायाने चिरडले. हे सर्व अवघ्या दहा ते पंधरा सेकंदात घडले आणि या तरुणाला वाचवण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. गावकऱ्यांनी तरुणाला रुग्णालयात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “काळ आला होता पण…” जीवावरचं संकट ‘रिक्षा’वर बेतलं; रेल्वे ट्रॅकमध्ये रिक्षा अडकली अन् समोरुन ट्रेन आली…थरारक Video

हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसच काही लोक प्राण्यांना अमानुष मारहाणही करतात. त्यामुळे प्राणी मित्र संघटनांकडून या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. प्राण्यांना जंगलात सुरक्षित संचार करता यावं, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही केली जात आहे. तसेच नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत.