Heart Attack Viral Video: बंगळुरू मधील IKEA दुकानात खरेदी करताना हृदयविकाराचा झटका आल्याने एक वृद्ध व्यक्ती जागीच कोसळला होता. मात्र यावेळी देवासारख्या धावून आलेल्या दुकानदाराने व योगायोगाने उपस्थित असलेल्या डॉक्टरने या वृद्धाचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणूसकी हरवत चाललेल्या जगात माणूसच माणसाचा खरा मित्र ठरू शकतो हे दाखवून देणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. तसेच या डॉक्टर व दुकानदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपण व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती जमिनीवर बेशुद्ध पडला आहे. या माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने अशी अवस्था झाली होती. तेव्हा एक डॉक्टर तिथे येऊन वृद्धाच्या छातीवर हात ठेवून रक्ताभिसरण आणि श्वासोच्छ्वास पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करू लागतो. जवळपास १० मिनिटे मेहनत केल्यावर अखेरीस त्या वृद्धाला शुद्ध आली व तो खोकू लागला.

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हे ही वाचा<< मांजर पाळल्यास हार्ट अटॅक येणार नाही? ९५०० वर्षे जुना आहे माणूस आणि मांजर यांच्यातील ‘हा’ संबंध, जाणून घ्या

ट्विटरवर रोहित डाक या युजरने शेअर केलेल्या व्हिडिओत या वृद्ध व्यक्तीचा प्राण वाचवणारा व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगितले आहे. डॉक्टर हे खरोखरच वरदान आहेत त्यांचा अभिमान आहे असे सुद्धा या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.

मृत्यूच्या दारातून खेचून आणला जीव

हे ही वाचा<< Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा

दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत ९ हजार लाईक्स व दोन लाख व्ह्यूज मिळाले आहेत, अनेकांनी डॉक्टरांचे कौतुक केले आहे. खरंच सर. तुम्ही त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे हजारो अश्रू थांबवले आहेत. मृत्यूच्या दारातून माणसाला परत आणण्याहून पुण्याचे व आनंदाचे काहीच नाही ” अशा कमेंट्स या व्हिडिओवर दिसत आहेत.