How To Easily Cut Pineapple Video: इंटरनेटवर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या हॅक व्हायरल होत असतात. त्यातील काही अगदीच अतिशयोक्ती वाटतात तर काही मात्र नीट वापरून पाहिल्या तर आपली अनेक कामं सोपी करू शकतात. अशीच एक अननस कापण्याची हॅक सध्या ट्रेंड होत आहे. अनेकदा असं होतं की तुम्हाला छान फ्रेश अननस बाजारात दिसतो, तुम्ही विकत घेतानाचा दुकानदाराकडून कापून घेता (त्याने दिला तर बरा) पण अख्खा अननस एका झटक्यात संपणं शक्य होत नाही. अनेकदा फ्रिजमध्ये पडून त्या अननसाचे कापलेले तुकडे काळपट होतात. यापेक्षा तुम्ही फक्त अननस घरी आणून स्वतःच कापला तर? कष्टाचं काम वाटतंय ना, पण या एका सोप्या ट्रिकने तुमचे कष्ट झटक्यात कमी होतील. चला तर पाहूया…
तुम्हाला एक छान धारदार चाकू लागेल आणि मग या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ट्रिक वापरून तुम्हीही सहज अननस कापू शकाल. एकदा का अननस कापला की मग तो स्नॅकिंगसाठी, गार्निशिंगसाठी किंवा अगदी फ्रेश पिना कोलाडा बनवण्यासाठी हवा तसा वापरू शकता.
अननस कापण्याची सोपी पद्धत (How To Easily Cut Pineapple)
हे ही वाचा<< पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? तरुणाचा जुगाडू Video पाहून म्हणाल, “भाई पैसे वाचले”
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये या हुशार व्यक्तीचे कौतुक केले आहे व आभारही मानले आहेत. कमीत कमी फळ वाया घालवून अधिकाधिक फायदा देणारी ही ट्रिक आहे असेही काहींनी म्हंटले आहे. काही युजर्स म्हणतात की आम्हाला विश्वास बसत नाही की एवढे दिवस आम्ही इतका अननस वाया घालवत होतो.
अननसाचे फायदे (Benefits Of Pineapple)
अननसामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते. शरीरात तयार होणाऱ्या अमिनो अॅसिडची निर्मिती रोखण्यास अननसातील ब्रोमेलन हा घटक अतिशय उपयुक्त असतो. अननसाच्या सेवनाने अपचन तसेच आळशीपणा या दोन्हीवरही मात करता येते. कॉन्स्टिपेशन समस्येवरही अननस खाणे हा अतिशय चांगला पर्याय असतो.