Pakistan Masterchef Viral Video: सोशल मीडियावर फूडी मंडळी अनेक आहेत पण अगदी क्वचितच काहीजण असे आहेत ज्यांना जेवण बनवण्याची सुद्धा आवड असते. जेवायला आवडतं आणि जेवण बनवायला आवडतं अशा दोन्ही गटांना आवडणारी एक कॉमन गोष्ट म्हणजे कुकिंग शो. मास्टरशेफचे अनेक देशातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता सुद्धा थेट पाकिस्तानच्या कुकिंग शोमधील एक व्हिडीओ समोर येत आहे. मास्टरशेफची ऑडिशन जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला ठाऊक असेलच की इथे आपल्याला आपण एक पदार्थ घेऊन या असं सांगितलं जातं. अर्थात यामागे तुम्ही तो बनवलेला असावा अशी अलिखित, अव्यक्त आशा असतेच. पण काही गोष्टी स्पष्ट न सांगितल्याने कसा गोंधळ होतो हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तान कुकिंग शो ‘द किचन मास्टर’ च्या ऑडिशन एपिसोडपैकी एक आहे. कुकिंग शोच्या ऑडिशनमध्ये स्वत: शिजवलेले जेवण आणलेच पाहिजे हा न सांगितला जाणारा नियम आहे. फक्त काहीतरी पदार्थ आणण्यास सांगितला होता त्याप्रमाणे आपल्या आवडत्या दुकानातील बिर्याणी घेऊन ही तरुणी ऑडिशनला पोहोचली होती. यावर उलट परीक्षकांनी प्रश्न करताच मी तर एकदम चांगल्या दुकानातून खायला घेऊन आले आहे, एवढ्या वेळ रांगेत सुद्धा उभी होते आता तुम्ही मला बिर्याणी न खाता परत कसं पाठवू शकता, मी जाणार नाही असा बेधडक युक्तिवाद सुद्धा या मॅडम करत होत्या.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

Video: बिर्याणी आणली तुमच्यासाठी…

हे ही वाचा<< भरगर्दीत मुंबई लोकलमध्ये रंगलं ब्रायडल शॉवर! मैत्रिणींनी ट्रेनमध्ये असं काही आणलं की नवरी… Video पाहून व्हाल थक्क

दरम्यान, हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी सुद्धा व्हायरल झाला होता तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडिओवर १० लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. काहींना या हुशार तरुणीचं लॉजिक बरोबर वाटत आहे तर काही फक्त कमेंट बॉक्स मध्ये मज्जा घेत आहेत. काहीही असलं तरी मॅडमचा कॉन्फिडन्स १००% कमाल आहे हे वाक्य तर जवळपास सर्वांच्याच कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. कदाचित हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असू शकतो पण असे प्रकार पाकिस्तानात घडणं काही वेगळं नाही असंही काहींनी म्हंटले आहे.