scorecardresearch

Video: MBA चा विद्यार्थी लग्नात जेवताना पकडला गेला, घडली जन्माची अद्दल; कुठल्या मित्राला पाठवायचं माहितेय ना?

Viral Video:एखाद्या लग्नात न बोलावता जाणं आणि तिथे फुकट जेवून येणं हे कित्येकांना फार थ्रिलिंग शकतं. मात्र आजचा हा व्हायरल व्हिडीओ बघून नक्कीच त्या इच्छेवर दुसऱ्यांदा विचार करा.

Video: MBA चा विद्यार्थी लग्नात जेवताना पकडला गेला, घडली जन्माची अद्दल; कुठल्या मित्राला पाठवायचं माहितेय ना?
Video: MBA चा विद्यार्थी लग्नात जेवताना पकडला गेला, घडली जन्माची अद्दल (फोटो: ट्विटर)

Viral Video: एखाद्या लग्नात न बोलावता जाणं आणि तिथे फुकट जेवून येणं हे कित्येकांना फार थ्रिलिंग शकतं. सोशल मीडियावर, चित्रपटांमधून अनेकदा असे काही लपून, चोरून दुसऱ्याच्या लग्नात जाऊन खाणाऱ्यांवर जोक्स व्हायरल होत असतात. मात्र खरंच कधी असा प्रयोग तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी केलाय का किंवा करायची इच्छा आहे का? असेल तर आजचा हा व्हायरल व्हिडीओ बघून नक्कीच त्या इच्छेवर दुसऱ्यांदा विचार कराल. मध्य प्रदेशातील एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये चक्क एका एमबीए शिक्षित तरुणाला लग्नात जबरदस्ती भांडी घासायला लावण्यात आल्याचे दिसत आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात…

या व्हिडीओ मध्ये दिसणारा तरुण हा मूळचा जबलपूर येथील असून भोपाळमध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून राहत आहे. अलीकडेच एका लग्नात त्याने विना आमंत्रण जाऊन जेवण्याचं विनाकारण धाडस केलं. पण या धाडसाची शिक्षा त्याला बदनामीच्या रूपात मिळाली आहे.

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की या तरुणाला चक्क भांडी घासायला लावली आहेत. या तरुणाचा व्हिडीओ शूट करताना एक जण त्याला “लग्नात येऊन फुकट खाण्याची शिक्षा काय माहीत आहे का? जसं घरात भांडी घासतोस ना तशी आता इथे घासायची” असे ऐकवत आहे, इतकंच नाही तर तुझे आई बाबा तुला पैसे पाठवत नाहीत का तू जबलपूरचं नाव खराब करतोयस असेही हा माणूस बोलताना ऐकू येत आहे.

दरम्यान, जेव्हा या विद्यार्थ्याला भांडी घासून झाल्यावर काय वाटतंय असं विचारलं तेव्हा तो त्यावर म्हणाला की फुकट जेवलोय सर काहीतरी करावंच लागणार ना? या उत्तरावरून तरी या विद्यार्थ्याने झाला याप्रकारे फार गांभीर्याने घेतला नाही असेच दिसत आहे मात्र तरीही नेटकरी या प्रकरणावर फारच नाराजी व्यक्त करत आहेत.

या व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये आपण पाहू शकता की, एकाने तर त्या तरुणाला भांडी घासायला लावलेल्या माणसाला खडेबोल सुनावले आहेत, कोणत्याही लग्नात न बोलावता जेवायला जाणे हा काही गुन्हा नाही त्यामुळे हे अशी शिक्षा देण्याची काहीच गरज नव्हती असे म्हणत काहींनी शिक्षा देणाऱ्या व व्हिडीओ बनवणाऱ्या यजमानांना अटक करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा<< ३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला…

हे ही वाचा<< “तर मी कपडे काढून.. ” ब्राझीलच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करणार ‘ही’ मॉडेल, फोटो पाहिलेत का?

तर काहींनी या व्हिडिओवर कमेंट करून अशा प्रकारे दुसऱ्याच्या लग्नात जाऊन जेवणे हे हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या तरुणाईसाठी काही नवीन नाही असेही म्हंटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:13 IST

संबंधित बातम्या