Video: आधी डोक्यावरून हात फिरवला, मग मिठी मारली; माकडाच्या या कृतीवर मांजरीने काय केले एकदा पाहाच | Video Monkey embracing cat goes viral Netizens call it Friendship goals | Loksatta

Video: आधी डोक्यावरून हात फिरवला, मग मिठी मारली; माकडाच्या या कृतीवर मांजरीने काय केले एकदा पाहाच

माकड आणि मांजरीमधील अनोखी मैत्री दाखवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

Video: आधी डोक्यावरून हात फिरवला, मग मिठी मारली; माकडाच्या या कृतीवर मांजरीने काय केले एकदा पाहाच
माकड आणि मांजरीमधील मैत्री पाहून तुम्हीही अचंबित व्हाल (फोटो : सोशल मीडिया)

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे तर काही आपल्याला अचंबित करणारे असतात. असाच अचंबित करणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड मांजरीच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मांजर शांत बसलेले असताना, समोरून एक माकड त्या मांजरीजवळ जात असल्याचे दिसते. माकड मांजरीजवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, इतकेच नाही तर मांजरीला मिठीदेखील मारतो. हे दृश्य पाहून तुम्हीही अवाक व्हाल. यावर मांजरीने काय प्रतिक्रिया दिली पाहा.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये मांजर आणि माकडामधील अनोखी मैत्री दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला ३८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला असून, या अनोख्या मैत्रीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:40 IST
Next Story
Viral Video: फोटोसाठी जीवघेणा स्टंट; बैलाच्या शिंगाला धरुन फोटो काढायला गेला अन् क्षणात…