scorecardresearch

मुंबई लोकलमध्ये ‘ती’ माईक व स्पीकर घेऊन चढली; प्रत्येक शब्दाला उंचावल्या प्रवाशांच्या भुवया, Video पाहा

Mumbai Local Lady Viral Video: आजवर आपण अनेकदा प्रवासात देणग्या मागणारे लोक पहिले असतील. यांच्यावर विश्वास ठेवताना काही वेळा मन कचरते, पण…

Video Mumbai Local Lady Passenger Enters with Mike And Speakers Says Something Shocking Clip Goes Viral
मुंबई लोकलमध्ये 'ती' माईक व स्पीकर घेऊन चढली (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mumbai Local Lady Viral Video: मुंबईच्या लोकलमध्ये जर आपण प्रवास केला असेल, करत असाल तर इथे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या माणसांना भेटू शकता. अगदी चौथ्या सीटसाठी कचाकचा भांडणारी लोकं ते कधी कुणाला साधा ठसका लागला तरी विंडो सीट सोडून बसायला देणारी मंडळी. भाज्या साफ करताना न सांगता पुढे येणारे मदतीचे हात.. कितीही मूर्खपणा करून धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या दिला जाणारा आधार सगळं काही तुम्ही एका प्रवासात सुद्धा अनुभवू शकता. असाच एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्वाभिमानी महिलेचा हा व्हिडीओ आहे. कॅप्शननुसार या महिलेने कॅन्सरवर मात केलेली असून आता कॅन्सरच्या रुग्णांसाठी तिने मुंबई लोकलमध्ये अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.

आजवर आपण अनेकदा प्रवासात देणग्या मागणारे लोक पहिले असतील. यांच्यावर विश्वास ठेवताना काही वेळा मन कचरते, आपल्या मेहनतीचे पैसे देताना त्यातुन खरंच कोणाला मदत होईल का असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण देणगी मागताना सुद्धा समोरच्याचा प्रयत्न इतका प्रामाणिक असेल तर प्रश्नाला जागाच उरत नाही. ही महिला रोज हातात माईक व मोठा स्पीकर घेऊन मुंबईच्या लोकलमध्ये चढते, गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन करते आणि यातून समोरच्याला परवडेल, इच्छा असेल इतक्या पैशांची मदत करण्यास सांगते. तिच्या आवाजाचा आणि हेतूचा गोडवा या व्हिडिओमध्ये दिसून येईल.

मुंबईच्या लोकलमधील गोडवा

हे ही वाचा<< Video: शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सव सोहळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून आपणही या महिलेला पाहिले असल्याचे सांगितले आहे. तिच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना तिच्या विनम्रतेवरही अनेकांनी भाष्य केले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 16:18 IST

संबंधित बातम्या