Viral Video : बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. एका भावासाठी आईनंतर काळजी करणारी सर्वात जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती बहिण असते. बहीण रुसते, फुगते पण भावाशिवाय राहू शकत नाही. बहीण भाऊ कधी मिळून हसतात, कधी एकमेकांना रडवतात, कधी भांडण करतात तर कधी एकमेकांची खोडी काढतात पण क्षणभर अबोला धरल्यानंतर हे एक क्षणही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. लग्नानंतर बहीण जेव्हा सासरी जाते तेव्हा सर्वात जास्त त्रास आणि दु:ख हे एका भावाला होते.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नात बहिणीला निरोप देताना भाऊ ढसा ढसा रडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी सासरी जात आहे आणि तिला सर्व निरोप देत आहे. तेव्हा तिचा भाऊ तिला मिठी मारत ढसा ढसा रडताना दिसतो. नवरी सुद्धा रडताना दिसते. या व्हिडीओमधून या बहीण भावाचे एकमेकांविषयी असलेले प्रेम दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ashu1331 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “बहीण कशी ही असो पण ती तिच्या भावाचा जीव असते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लग्नाच्या अगोदर प्रत्येक गोष्टीत बहिणीला टॉन्ट मारणारे भाऊ बहिणीचं लग्न झालं की खूप रडतात. खरंच हाच क्षण हृदयपर्शी आहे. डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून..” तर एका युजरने लिहिलेय, “स्वतः ची हक्काची एक का होईना बहीण पाहिजे. बाकी दुनियादारी कोणी कोणाचं नाही..” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक बहीण ही तिच्या भावाचा जीव असते…!” एक युजर लिहितो, “माझ्या नशीबात नाही भाऊ हे सुख” तर एक युजर लिहितो, “एक तरी बहीण पाहिजे.” आणखी एक युजर लिहितो, “हा क्षण प्रत्येक भावासाठी खूप कठीण असतो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.