Viral Video : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात तुफान गर्दी दिसून येत आहे. छावा चित्रपटदरम्यान चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. कोणी चित्रपट बघून रडताना दिसत आहे तर कोणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा वेश परिधान करून चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येत आहे. काही लोक शिवगर्जना करताना दिसत आहे तर काही लोक भावुक झालेले दिसतात. (video of a child cried while doing shivgarjana after watching chhava movie based on Chhatrapati Sambhaji Maharaj)
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भर चित्रपटगृहात शिवगर्जना करताना ढसा ढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. हा चिमुकला भर चित्रपटगृहात शिवगर्जना करतान दिसतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शिवगर्जना करताना तो भावुक होतो आणि ढसाढसा रडतो. शिवगर्जना करताना चिमुकल्याचे घळाघळा अश्रू वाहताना दिसतात. त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती त्याला मागून धीर देताना दिसते. या चिमुकल्याच्या हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात संस्कार खूप छान बाळ… छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय….” तर एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय प्रेम असेल या पोराचे महाराजांवर” आणखी एका युजरने लिहिलेय, “मन जिंकल ह्या छोट्या मावळ्याने” एक युजर लिहितो, “खूप छान संस्कार… छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती संभाजी महाराज की जय” तर एक युजर लिहितो, “मराठा योद्धा मरत नाही..तर तो अजरामर होतो…..जय शंभू राजे”
अभिनेता विकी कौशल याने या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ तो स्टोरीवर शेअर करताना दिसतोय. विकीने या चिमुकल्याचा सुद्धा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. तुझा अभिमान आहे मुला… काश मी तुला घट्ट मिठी मारू शकलो असतो. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार. शंभूराजे यांची कथा जगातील प्रत्येक घराघरात पोहोचावी अशी आमची इच्छा आहे आणि असं घडताना पाहणे, हा आमचा सर्वात मोठा विजय आहे.”