Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, आपुलकी आणि जिव्हाळा असतो. वडिलांसाठी त्यांची मुलगी ह एक राजकुमारी असते तर मुलीसाठी तिचे वडील सुपरमॅन असतात कारण वडील मुलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी काहीही करू शकतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी चिमुकल्या मुलीसाठी असं काही केलं की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या वडिलांनी मुलीचा शाळेतला पहिला खास बनवण्यासाठी आणि ती शाळेत जाताना घाबरू नये म्हणून तिची चक्क मिरवणूक काढली आणि तिला तिच्या आवडत्या सायकलवर बसवून तिला शाळेत पोहचवले.
लहान मुले शाळेत जाण्यासाठी घाबरतात. काही जण तर शाळेत जायला तयार नसतात पण एका व्यक्तीने आपल्या मुलीचा शाळेतला पहिला दिवस इतका खास बनवला की तिला शाळेत जायला कधीही भीती वाटणार नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सायकलवर बसलेल्या एका चिमुकलीची घरापासून ते शाळेपर्यंत मिरवणूक काढली आहे आणि तिचा शाळेचा पहिला दिवस तिच्या वडिलांनी अविस्मरणीय बनवला आहे. या मिरवणुकीत तिचे कुटुंब सुद्धा सहभागी झालेले दिसत आहे. एवढंच काय तर शाळेच्या गेटवर शिक्षक सुद्धा या चिमुकलीचं स्वागत करण्यास उभे आहेत. चिमुकलीला शाळेची भीती वाटू नये, म्हणून वडिलांनी हे सर्व केलंय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावाने नवीन ट्रेंड सुरू केला आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक कामगिरी याच उत्साहाने साजरी कराल आणि तिला आयुष्यात पुढ जाताना आणि यशस्वी होताना पाहाल” तर एका युजरने लिहिलेय, “वडिलांसाठी आदर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलीचे शिक्षण खूप गरजेचे आहे. हा व्हिडीओ अनेकांना शिकण्यास प्रोत्साहन देईल” एक युजर लिहितो, “मला हे खूप आवडलं” तर एक युजर लिहितो, “आम्हाला तर मारून मारून पाठवायचे” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून वडिलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.