काहीही विचार करू नका, काहीही बोलू नका, कुठल्याही शंका उपस्थित करू नका. हे खरं आहे का? हे काँप्युटर इफेक्ट्स आहेत का वगैरे विचार मनात बिलकूल आणू देऊ नका. तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा आणि खालचा जीआयएफ व्हिडिओ पहा…..

 

via GIPHY

ही एक पाल आहे! आणि या पालीला ही बाई खेचत खेचत नेत आहे. ही घटना आॅस्ट्रेलियामधल्या न्यू साऊथ वेल्स राज्यातल्या एक हाॅटेलमधली आहे. ‘मिमोसा वाईन्स’ या वाईनरीमधल्या या हाॅटेलमध्ये ही ‘पाल’ शिरली. एकतर पाल आणि तीपण एका छोट्या मगरीच्या आकाराची. जाम भयानक प्रकरण आहे हे. एरव्ही दोन इंचाची पाल असली तरी आपण घराच्या या टोकापासून त्या टोकाला धूम ठोकतो (कोणीही अपवाद नाही, बायकांवर हसणं सोडा आता). आजकाल पालींना झाडूने मारण्याची कलासुध्दा लुप्त होत चालली आहे. आपण डायरेक्ट ‘बेगाॅन’ चा अर्धा डबा ती पाल अर्धमेली होईपर्यंत तिच्यावर मारतो आणि मग अगदीच ती हलेनशी झाल्यावर तीनतीनदा तिला झाडूने डिवचून ती मेल्याची खात्री करत केरसुणीत उचलून तिच्याकडे नजर जाणार नाही अशा पध्दतीने केरसुणी कमीतकमी दहा फूट दूर ठेवत घराबाहेर/कचऱ्याच्या डब्यात टाकतो.

बघा स्वत:कडे आणि बघा या अजगराची मावशी असलेल्या पालीला हाताने धरत तिला या हाॅटेलबाहेर काढणाऱ्या या वेट्रेसकडे!

ही पाल ‘गोआना’ या जातीची पाल आहे. आणि तिेच्याशी धैर्याने मुकाबला करणाऱ्या या वीरांगनेचं नाव आहे समिआ लिला. समिअा मूळची फ्रेंच आहे. तिनेच आॅस्ट्रेलियाच्या ‘सिडनी माॅर्निंग हेराल्ड’ या पेपरला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार तिला आधी वाटलं की हाॅटेलमध्ये एखादा कुत्रा शिरलाय. आता कुत्रा काय एवढा भीतीदायक आणि कुरूप नसतो  त्यामुळे हे नक्की काय बेणं आहे हे पाहण्यासाठी समिअा पुढे आली तेव्हा तिला ही मगरीची मावशी दिसली. तोपर्यंत या पालीपासून वीस-पंचवीस फूट दूर असलेले ग्राहक त्यांच्यासाठी ठेवलेल्या मुलायम खुर्च्यांवर चढून उभे राहिले होते.

व्हिडिओसाठी स्टंटमनचा लंडनच्या गगनचुंबी इमारतीवर स्टंट

पण समिअाने जिद्द हरली नाही. तिने या पालीची शेपटी पकडून तिला हाॅटेसबाहेर काढलं. हे सगळं करताना त्या पालीने पळून जायचा प्रयत्न केला. ती प्रचंड वळवळली. पण शेवटी समिआचा विजय झाला. ही संपूर्ण लढाई पाहायचीये? करा क्लिक खालच्या व्हिडिओवर