Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून मन भावुक होते तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या पुतणीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची पुतणी त्याला मिठी मारत रडताना दिसत आहे. तो त्याने पुतणी का रडत असल्याचे कारण सांगितले आहे. हे कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाजवळ त्याची पुतणी उभी आहे आणि ती रडताना दिसत आहे. तेव्हा हा तरुण पुतणीला समजून सांगताना दिसत आहे.

तरुण म्हणतो, “आम्ही खूश आहे.. एवढ्यात आम्ही खूश आहे” तो पुढे कोणाला तरी हसत म्हणतो, “व्हिडीओ कशाला करतेस?”

पुतणी मात्र रडताना दिसते.
पुतणी म्हणते, “मला ८० तरी पाहिजे होते”

तेव्हा तरुण मजेत म्हणतो, “आपण वाढवून देऊ या ८०. पेनाने आपण करून देऊ या ८०.”

पण पुतणीचे रडणे थांबत नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “माझ्या पुतणीला १० वीला ७९.८० टक्के पडले. तिला ८० टक्के पडले नाही म्हणून रडत होती आणि आम्ही एक होतो पास झाल बास झालं”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

akash_lokhande_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही कराडकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पोरीला २० पॉईंट साठी रडवणाऱ्या बोर्डाचा जाहीर निषेध. दिदे तुझ्या टक्यात आनंदाने २ पोर पास झाली असती …. समाधानी रहा चांगले मार्क्स आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “बाई मला ४७ टक्के पडले होते. संपूर्ण भाऊकीला पेढे वाटले होते मी” आणखी एका युजरने लिहिलेय, “रिचेकिंग फॉर्म भरा..” एक युजर लिहितो, “अरे ७९.८० म्हणजे ८०% आहेत ते.. अभिनंदन बाळा” तर एक युजर लिहितो, “अभिनंदन दिदी प्रयत्न केला आहे ना.. नाराज होऊ नकोस. या वेळेस ७९ टक्के घेतलेस ना बारावीला तुला ९० टक्के पडतील.” अनेक युजर्सनी त्यांचे दहावी बारावीचे टक्के सांगत चिमुकलीला नाराज होऊ नको असा सल्ला दिला आहे. काही युजर्सनी चांगले मार्क्स मिळाल्याचे सुद्धा सांगितले आहे. हा व्हिडीओ जवळपास एक लाख लोकांनी लाइक केला आहे.